माझे फोटो

Saturday, 18 June 2011

नाच रे आठवणी च्या...

नाच रे आठवणी च्या फुला , तुला  काही तरी कळेल  ना 
बघ माझ्या आठवणीमध्ये , ती तुला हळूच हसवेल ना
हसताना ती तुला हळूच स्पर्श करेल.. 
त्या स्पर्शामध्ये बघ माझी आठवण तुला येईल ना .... 
नाच रे आठवणी च्या फुला...

नाच रे आठवणीच्या पाऊसा ,तुला थोड तरी समजेल ना
बघ माझ्या आठवणीमध्ये , ती तुला हळूच भिजवेल ना
भिजताना ती तुला हळूच  पुसेल ना
त्या क्षणामध्ये बघ माझी आठवण तुला येईल ना .... 
नाच रे आठवणीच्या पाऊसा

नाच रे मन रुपी मोरा , तुला थोड तरी उमजल ना
बघ माझ्या आठवणीमध्ये , ती  तुझा पिसारा फुलवेल ना
फुललेल्या  पिसार्यामध्ये ती हळूच सजेल ना
त्या सजण्यामध्ये बघ माझी आठवण तुला येईल ना .... 
नाच रे मन रुपी मोरा

नाच रे निळ्याभोर ढगा , तू थोड तरी माझी गर्जना ऐकशील ना
बघ माझ्या आठवणीमध्ये , ती  तुला हळूच तरंगवेल  ना
तरंगलेल्या त्या नभांमध्ये ती हळूच लाजेल ना
त्या लाजण्यामध्ये बघ माझी आठवण तुला येईल ना .... 
नाच रे निळ्याभोर ढगा...


         - सचिन तळे ( 18/06/2011 )

Friday, 17 June 2011

हजारदा शहाण्यावानी , हजारदा वेड्यावाणी ...


हजारदा शहाण्यावानी , हजारदा वेड्यावाणी 
मी आहे तरी कसा , मी वागतो तरी कोणा वाणी  ..

कधी गावातल्या वाटेवरती ,कधी मित्रांच्या त्या संगतिनी
टवाळगिरी हि माझी नीती , मी नसतोच कधी शहाण्यावानी 
टपोरी म्हणतात मला जरी , तरी मी आहे वर्गात पहिला नंबरी
आहो , मी आहे तरी कसा , मी वागतो तरी कोणा वाणी ... 

कधी पुस्तकांच्या वाटेवरी , कधी पाउसाच्या धारेमधी
शिळेवर वाजवतो शिळ , माझाच माझ्यात  नाही मेळ
हुशार म्हणतात  मला जरी , तरी उसळे माझ्यात मस्तीखोरी
आहो , मी आहे तरी कसा , मी वागतो तरी कोणा वाणी ... 

कधी वाटते डॉक्टर व्हावे , कधी वाटे इंजिनेर
विज्ञानाचा माझ्याशी संबध नाही , इंजिन चा आवाज लय भारी 
 जेव्हा जेव्हा करतो विचार , तेव्हा म्हणे जाऊ दे न यार 
 आहो , मी आहे तरी कसा , मी वागतो तरी कोणा वाणी  ...


संध्याकाळी झाडाखाली ,  पाहतो मी एकटक त्या मावळत्या सूर्याला हि
आसवे नाव माझे हि , या सूर्य चंद्रावानी या जगी
उडणाऱ्या पक्ष्यावानी , पंख लाउनी , उडावे गगनी 
जरी मनी , ध्यानी आसे काही , तरी नाही मी शहाण्यावानी
 मी आहे तरी कसा , मी वागतो तरी कोणा वाणी  
हजारदा शहाण्यावानी , हजारदा वेड्यावाणी ...


- सचिन तळे ( 17/06/2011 )