माझे फोटो

Tuesday 19 March 2013

मुंबईकरांच्या नजरेतून .. शरद पवारांची ..राष्ट्रवादी..

मी मुंबईकर ...घड्याळ्यात असणाऱ्या सेकेंद काट्यगत सतत न थांबता कार्यरत असणारा ..स्वताच्या घरात स्वताच्या अस्तित्वासाठी भांडणारा ..चार भिंतीच्या आत राहून चंदेरी दुनियाचे स्वप्न पाहत कष्टाने अन घामाच्या धारेने शांत पने झोपणारा .. पाटीवर कितीही वार झाले ते निमूट पने सहन करत देशाची आर्थिक बाजू सांभाळणारा ..साधा भोळा मुंबईकर . पण आम्हा मुंबईकरांची एक वैशिष्ट म्हणजे एकत्र येण्याची व एकमेकांना साथ देण्याची वृत्ती .म्हणून तर मुंबईत झालेले बॉम्बस्फोट असो , अतिरेकी हल्ले असो , हर एका महिन्यात होणारे छोटे मोटे राजकीय व जातीय दंगली असो ..हे सर्व पचवत कार्य करत स्वताच्या आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय घडामोडीकडे जातीने लक्ष्य देणारा मुंबईकर राजकारणात हि तेवढ्याच प्रमाणात सक्रीय असतो म्हणून मुंबईत हर घरात एक कार्यकर्ता हा बिनचूक दिसेल .


मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी म्हणून.. देशाच्या कानोकोपर्यातून लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येतात आणि इथेच वास्तव्य करतात . तिथले राजकीय मुडदे इथे पेटवून स्थानिकांना डावलत स्वताच शक्ती प्रदर्शन भरवतात . या वाढत्या परप्रांतीयामुळे वाढत चालेली गुन्हेगारी , वाढत चालेली अनधिकृत बांधकामे ,वाढत चालेली बेकारी , मुंबईत अपुर्या पडणार्या सोई सुविधा आणि ह्यांना स्वताची वोटबँक बनवून त्यांना पाटीशी घालणारी सर्व राजकीय पक्ष्या बद्दल मुंबईकरांच्या मनात सातत्याने चीडचीड हि वाढतीय.. मंग .. त्यात कॉंग्रेस सारख्या भ्रष्टाचारी पक्ष्याला हातात घड्याळाची दोरी बांधून लढणारी शरद पवारची राष्ट्रवादी हि अपवाद ठरत नाही . आजही स्वताला अल्पसंख्याक म्हणून घेणार वर्ग व परप्रांतीय वर्ग राष्ट्रवादीच्या पदावर विराजमान दिसतील उदा . नवाब मलिक ते कालचे नरेंद्र वर्मा आणि सहकार शेत्रात राष्ट्रवादीच वर्चस्व असल्याने स्वार्था पाई कार्यालयात जमणारे मुंबईतले सहकारी मंडळी बस्स ..एवढीच शरद पवार साहेब.. एवढीच तुमची राष्ट्रवादी मुंबईत कॉंग्रेस च्या भारोसावर शामियाना मांडून बसलीय ... मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मराठी अस्मिता ..ह्या विषयावर जो नेता बोलतो ..लढतो ..मुंबईकर त्यांच्याच विचारणावर व आदेशावर वाहत जातान दिसतो. म्हणून तर मा . श्री . बाळासाहेबांपासून ते राज ठाकरे यांची मनसे तुम्हाला मुंबईत नव्हे तर राज्याच्या कानोकोप्र्यात दिसेल . गल्लीतून दिल्लीत जाऊन कोणीतरी महाराष्ट्राची वाचा फोडावी ..कोणीतरी मुंबईच्या पाठ्वर्ती वाढत चालेल जन वारूळाच स्फोट दाखूवन द्याव .. कोणीतरी मुंबईच्या गल्लीतल गोंधळ दिल्लीश्वरा समोर मांडव .. कोणीतरी सह्याद्रीचा व मराठी संस्कृतीचा वारंवार होणारा अपमान थांबवावा .. कोणीतरी सळसळत रक्त घेऊन दिल्लीत महाराष्ट्राचा ध्वज उभारावा ...यासाठी मुंबईकर सार वैर विसरतो .कॉंग्रेस च्या भ्रष्टाचारी संस्कृतीत वाढलेल्या ताई ना मदत करतो .मंग शरद पवार साहेब तुम्ही जर पंतप्रधान होणार असेल तर तुमच्यावर झालेले आरोप प्रत्यारोप सार काही विसरून हा मुंबईकर तुमच्या पाठीशी उभा राहील ..पण , मुंबईकरांच्या विषयाला बोट लावणार असेल तर ...

अस हि म्हणतात कि शरद पवारांनी फक्त आणि फक्त बारामतीचा विकास केला , केला असावा जसा विलासरावांनी लातूरचा केला तसा .पण जश्या नाण्याच्या दोन बाजू नाकारता येत नाही तश्या शरद पवारच्या चांगल्या बाजूला हि नाकारत येत नाही ..कितेक उद्योग धंदे ,कितेक सहकारी कारखाने उभारली ..मान्य आहे कि शरद पवारांवर आरोप झाले मंग त्यात मुंबई महानगर पालिकेचे माजी उपाउक्त गो. रा. खैरनार चा आरोप असो कि अण्णा हजारेच उपोषण " पवार सरकार भ्रष्ट अधिकार्यांना पाटीशी घालतय " असल्याचा आरोप.. ते काही दिवसापुर्वीच लवासा प्रकरण इ . पण चातुर्याची बाब म्हणजे आरोप झाले ते सिद्ध कोणीच करू शकल नाही . म्हणून तर एका दगडात दोन पक्षी मारून मी दगड मारलाच नाही इतक्या चातुर्याने राजकारण खेळणार व्यक्तिमत्व ह्या आताच्या महाराष्ट्रात व देशात होणे नाही .

शरद पवार साहेब .. वयाच्या २९ व्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्री मंडळात तुम्ही समावेश केला , चार वेळा महाराष्ट्राच मुख्यमंत्री पद भूषवल , महाविद्यालीन वयात भर तारुण्यात सळसळत रक्त घेऊन यशवंतरावा समोर छाप पाडून युवा वर्गाचा नेतृत्व करून ,कॉंग्रेस मधून बाहेर पडून, कॉंग्रेसच्याच बरोबरीने बसून राजकारण खेळून , पुलोद पासून ते आता पर्यंतच तुमच राजकीय कारकीर्द आणि त्यात सहकार शेत्रात असणार तुमच वर्चस्व , केंद्रीय मंत्री मंडळातल तुमच वजन हा सर्व कार्याचा पसारा मुंबईतल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणाच देणार ठरेल. मा. श्री. बाळासाहेब गेल्यानंतर मुंबईतल्या राजकारणात खूप मोठी पोकळी तयार झालीय . बाळासाहेबा नंतर या मुंबईकरांच वडीलधारी ( राजकीय ) छत्र नाहीस झालय . त्यांच्या जागेवर आता कोणी येईल अस वाटत नाही .. परत मुंबईत वाघाची डरकाळी होणे नाही . म्हनून आपण म्होरके होवून राजकीय वडिलकीच्या नात्याने मुंबईतल्या तमाम मराठी बांधवाना दिशा व मार्गदर्शन करावे हीच तुमच्या वाढदिवस निम्मित मुंबईकरांच्या मनातून सदिच्छा ... जय महाराष्ट्र



- सचिन कृष्णा तळे