माझे फोटो

Saturday, 8 December 2012

---------------------------------------------
कविता :   आमुची भाषा
=========================


कशी कळेल तुम्हास आमुची भाषा
कशी वळेल तुम्हास आमुची भाषा

मातीत या आमच्या सुगंध मराठीचा
देश हो ! जिंके अमृतास आमुची भाषा

इतिहासाच्या पानावरी छाप मराठ्यांचा
धारदार त्या सह्याद्रीस आमुची भाषा

हिंदू तेजाचा सूर्य नांदे शिवनेरी
लढते आज जगण्यास आमुची भाषा

प्रिय मां भारती प्राणाहुनी सरताज
लोक हो तुम्हा स्वागतास आमुची भाषा

मराठीया नगरी संतांची असे दाटी 
रणा गणात तलवारीस आमुची भाषा

इथल्या मातीत अंकुरते बीज संस्कृतीचे
कलेच्या घागरी भरण्यास  आमुची भाषा

शोध कितीही वाळवंटात अनेक  भाषा
हृदयातूनी बोलतो देवास आमुची भाषा

-----   सचिन तळे  2012