माझे फोटो

Saturday, 21 April 2012

काय म्हणू र , काय मी दादा


काय म्हणू र , काय मी दादा
आल वादळ , माझ्या दारा

चार भिंती शेनामातीच
छपर माझ वाऱ्यावर
नभासवे धरणाला पाझर
आला धो धो करत दारा
काय म्हणू र , काय मी दादा

होती चार भांडी फुटकी
घेऊन गेली ती हि बाई
नव्याने होता संसार थाटला
आज डोळ्यात पाणी पाणी
काय म्हणू र , काय मी दादा

नकोस ईचारू तुझ्या ताईला
फाटकी लुगडी आहे अंगाला
शेत गेल भिजून सार आज
धनीस बसला नशिबी चटका
काय म्हणू र , काय मी दादा

नकोच मला धनाची पोटरी
हवी माहेरची मायाळू भेटी
वहिनी घेईल का रे दारा ?
देशील का रे थोडा सहारा
काय म्हणू र , काय मी दादा

आता कुठे थोडस उन दिसलं
नभातून काळ दैतघन हे पुसलं
फक्त मन हळवं कराया आले
माहेरी मिळेल का रे सात्वन दादा
आल वादळ र , माझ्या दारा - कविरंग सचिन तळे

Sunday, 8 April 2012

निमित्त होत तिच्या माझ्या लग्नाचा

मी गेलो होतो दारी तिच्या
सोबत चार पाहुण्यांचा होता विडा
डोक्यावर होता पदर तिचा
नजर होती बावरी
कांदे पोहेच्या हर एक शेंगदाण्यावरी
प्रेमात पडलो मी तिच्या वरी

निमित्त होत तिच्या माझ्या लग्नाचा
डोक्यावर बाशिंग बांधण्याचा 
तिच्या बरोबर बोलताना
जीवच भांड्यात पडला होता
तिच्या हून जास्त लाजण्याचा
श्रुंगार माझा सजला होता

तिने होकार दिल्यावर
मी अचानक बावरलो
स्तब्द झालो त्या क्षणी, अन कळलच नाही
मी तिच्या  बरोबर ,
आजून काय काय कुजबुजलो

मंग कुठे जाऊन
पंडिताच्या पोतीवरी , लग्नाची तारीख ठरली
गोड झाले सर्वांचे तोंड
लहानांना आले हसू
जणू  ,शाळेची सुट्टीच ठरली

जावाई बापू म्हणत म्हणत
एक म्हातारी समोर आली
अन बुंदीच्या लाडूचा मला
चांगलीच कसरत करायला लावली

ती होती माझ्या शेजारी
म्हणत होती आई नि मामी
" काय, लक्ष्मी नारायणाचा जोडा, आहे कि नाही "
मी चुकून म्हणालो " हो "
आन ती हळूच गालात लाजली

मंग जाताना , जड पाउलांनी
मी तिला मागे मागे वळूनी पाहत होतो
तिने एक छोटीशी स्माईल दिली
अन परत तिच्या प्रेमात मी
असा काही पडलो
कि आता रात्र दिवस फक्त
तिलाच आठवत बसलो - सचिन तळे 08/04/2012