माझे फोटो

Saturday 8 December 2012

---------------------------------------------
कविता :   आमुची भाषा
=========================


कशी कळेल तुम्हास आमुची भाषा
कशी वळेल तुम्हास आमुची भाषा

मातीत या आमच्या सुगंध मराठीचा
देश हो ! जिंके अमृतास आमुची भाषा

इतिहासाच्या पानावरी छाप मराठ्यांचा
धारदार त्या सह्याद्रीस आमुची भाषा

हिंदू तेजाचा सूर्य नांदे शिवनेरी
लढते आज जगण्यास आमुची भाषा

प्रिय मां भारती प्राणाहुनी सरताज
लोक हो तुम्हा स्वागतास आमुची भाषा

मराठीया नगरी संतांची असे दाटी 
रणा गणात तलवारीस आमुची भाषा

इथल्या मातीत अंकुरते बीज संस्कृतीचे
कलेच्या घागरी भरण्यास  आमुची भाषा

शोध कितीही वाळवंटात अनेक  भाषा
हृदयातूनी बोलतो देवास आमुची भाषा

-----   सचिन तळे  2012

Monday 12 November 2012

चुलीवरच प्रेम ....

मुळात विश्वाची निर्मिती हि प्रेमातून झालीय, संपूर्ण विश्वाला एका शब्दात सामवणारा शब्द म्हणजे प्रेम . मंग हे विश्व ब्रह्मांड असो वा चार भिंतीतल घरकुल आणि घरकुल म्हंटल कि , चूल व मुल या दोन शब्दांची भर पडतेच पडते . घरट्यातल घरपण हे घरात वावरणाऱ्या त्या चार पाखरांवर अवलंबून असत आणि त्या नात्यात उमलणार प्रेम म्हणजेच चुलीवरच प्रेम .. घर म्हंटल कि भांडण , तंटा , जिव्हाळा ..रडण , हसन , रुसन ..एकमेकांना फसवण , समजवण , समजून घेण ..
ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला जाणवतात . जसे भाजी मध्ये मिट , मिरची , साखर इ. बाबीमुळे भाजी जशी चवदार बनते तसेच ..संसारच्या ह्या चुलीवर हि भांडणामुळे प्रेम अधिकच मजेदार होत .
दररोज सकाळ पासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या भोवताली कोणत्या तरी एक घरात नवर्या बायकोच भांडण हे चालूच असत किवा दिसतच दिसत. कधी कधी आपल्या घरात हि  .. ते दृश बिनचूक आढळत . एकमेकांची जीव घेणार कि काय ? असच दृश हे जगा समोर तयार करत  असतात . मंग ते आजू बाजूस कोणी आहे का ? लोक काय  म्हणतील ह्याचा काडीमात्र
विचार न करता एकमेकांच पक्के वैरी गत वागतात . अन उलट दुसर्या दिवशी पाहिलं
कि हातात हात घेऊन बागेत फिरताना दिसतात .पण त्यावेळी त्यांच्या भांडणात जो पडतो तो पक्का
त्यांचा वैरी झालेला असतो . मी हि आतापर्यंत आई वडिलांची भांडणे खूप वेळा पहिली  आणि अनुभवले आहे पण कधी त्यांच्या मधी पडण्याची धाडस केल नाही , कारण दुसर्या दिवशी
आईचं बाबांना डबा बनवून देते अन बाबा आईला संध्याकाळी  स्वपाकांत मदत करताना दिसतात .
काही दिवसापुर्वीची गोष्ट आहे ..कामावरून घरी परताना एका घरात जोरदार भांडण चाल होत , पण त्या भांडणातून काही तरी वाईट घडल अस चित्र मला दिसलं नव्हत , वाटल कि धाडस कराव अन जाऊन ते भांडण सोडवाव पण त्यावेळी मला कॉलेजचा वाटेवरच एक प्रसंग आठवल . आमच्या कॉलेजच्या बाजूला एक चाळ होती. मी आणि माझे काही मित्र styand  वर चालो असताना
त्या चाळीतल्या एका घरात जोरदार भांडण चालू होत . नवरा हा दारू पिऊन त्याचा बायकोला शिव्या गाळ करत मार झोड करत होता . आम्हाला ते बगवल नाही , आम्ही सरळ त्याला गटाला त्या बाई ला बाजू सारतत्या नवर्याचा काना खाली चार वाजवली आणि सरळ पोलिसांकडे घेऊन गेलो ..
आणि घडलेली सर्व घटना पोलीस अधिकारीना सांगितलं .. पोलीस त्याला दम देणार तेवढ्यातच
 ती बाई पळत आली आणि आम्हालाच चार शब्द सुनवून गेली " माझा नवरा आहे तो मला मारेल किवा माझा जीव घेईल तुम्हाला काय त्याच ... सोडा माझ्या नवर्याला .." हे वाक्य एकूण मलाच माझ्या थोबाडीत मारल्या वाणी झाल. मंग त्यावेळी त्या पोलीस अधिकारी नि
 समजावलं कि ..  “ अरे मुलानो हे चुलीवरच प्रेम आहे चूल पेटवली तरच पोट भरत , संसार चालत ..अन चूल पेटली तर चटके  हे बसणारच. “
सचिन कृष्णा तळे

Wednesday 19 September 2012

स्रिया....

अंधाराच्या वाटेवरी भरडताहेत स्रिया

जन्मा आधीच डोळे मिटताहेत स्रिया

आई म्हणू कुणास ,कुणास म्हणू ताई
वारसदारा पाई बळी पडताहेत स्रिया

इतिहासा परी झळकल्या झाशीच्या तलवारी
कसे वासानांतरी चिखलात रुजताहेत स्रिया

वसुंधरेच लेन लेऊन सजते ती माहेरी
सासरच्या जखमेने रोज रडताहेत स्रिया

सृष्टीची नांदी तिच्या पदारातच नांदत असते
विसरुनी सारे दुख रोज जगताहेत स्रिया


- सचिन तळे

Saturday 21 April 2012

काय म्हणू र , काय मी दादा


काय म्हणू र , काय मी दादा
आल वादळ , माझ्या दारा

चार भिंती शेनामातीच
छपर माझ वाऱ्यावर
नभासवे धरणाला पाझर
आला धो धो करत दारा
काय म्हणू र , काय मी दादा

होती चार भांडी फुटकी
घेऊन गेली ती हि बाई
नव्याने होता संसार थाटला
आज डोळ्यात पाणी पाणी
काय म्हणू र , काय मी दादा

नकोस ईचारू तुझ्या ताईला
फाटकी लुगडी आहे अंगाला
शेत गेल भिजून सार आज
धनीस बसला नशिबी चटका
काय म्हणू र , काय मी दादा

नकोच मला धनाची पोटरी
हवी माहेरची मायाळू भेटी
वहिनी घेईल का रे दारा ?
देशील का रे थोडा सहारा
काय म्हणू र , काय मी दादा

आता कुठे थोडस उन दिसलं
नभातून काळ दैतघन हे पुसलं
फक्त मन हळवं कराया आले
माहेरी मिळेल का रे सात्वन दादा
आल वादळ र , माझ्या दारा - कविरंग सचिन तळे

Sunday 8 April 2012

निमित्त होत तिच्या माझ्या लग्नाचा

मी गेलो होतो दारी तिच्या
सोबत चार पाहुण्यांचा होता विडा
डोक्यावर होता पदर तिचा
नजर होती बावरी
कांदे पोहेच्या हर एक शेंगदाण्यावरी
प्रेमात पडलो मी तिच्या वरी

निमित्त होत तिच्या माझ्या लग्नाचा
डोक्यावर बाशिंग बांधण्याचा 
तिच्या बरोबर बोलताना
जीवच भांड्यात पडला होता
तिच्या हून जास्त लाजण्याचा
श्रुंगार माझा सजला होता

तिने होकार दिल्यावर
मी अचानक बावरलो
स्तब्द झालो त्या क्षणी, अन कळलच नाही
मी तिच्या  बरोबर ,
आजून काय काय कुजबुजलो

मंग कुठे जाऊन
पंडिताच्या पोतीवरी , लग्नाची तारीख ठरली
गोड झाले सर्वांचे तोंड
लहानांना आले हसू
जणू  ,शाळेची सुट्टीच ठरली

जावाई बापू म्हणत म्हणत
एक म्हातारी समोर आली
अन बुंदीच्या लाडूचा मला
चांगलीच कसरत करायला लावली

ती होती माझ्या शेजारी
म्हणत होती आई नि मामी
" काय, लक्ष्मी नारायणाचा जोडा, आहे कि नाही "
मी चुकून म्हणालो " हो "
आन ती हळूच गालात लाजली

मंग जाताना , जड पाउलांनी
मी तिला मागे मागे वळूनी पाहत होतो
तिने एक छोटीशी स्माईल दिली
अन परत तिच्या प्रेमात मी
असा काही पडलो
कि आता रात्र दिवस फक्त
तिलाच आठवत बसलो - सचिन तळे 08/04/2012

Saturday 31 March 2012

जसा कळपात हरीणपाडसा

कसा शोधू मी कसा , तुला ग सखे सांगना
हूर हूर मनी भावला असा , जसा कळपात हरीणपाडसा

हरवली सखी साजणी , रानमाळी कुठेच दिसेना
धीरावा धरू मी कसा . हृदय हे वेडावला असा

हे रान सार सुने , सुनी  जाहले हे अंबर घना
फिरावा कुठवर नजरांचा तुंरा, तुला शोधता शोधता

तू नाजूक फुलांचा आरसा , तुज भोवती सुरंग पारध्याचा
लढा मी कसा , द्यावा आत्ता , तुज ठाव ना कुणा

कुठवर पाहू आता , आकाशी पेटला जाळ चांदण्याचा
भडकावा वणवा अन जळावा , तुझ्या विरह रुपी शब्दांचा पेंढा

हे गणा विनवणी तुला , प्रीतीच्या पाखरांचा उडू दे थवा
हूर हूर मनी भावला असा , जसा कळपात हरीणपाडसा - सचिन तळे

Friday 30 March 2012

दऱ्या खोरयातून चाले नार सतरंगी

दऱ्या खोरयातून चाले नार सतरंगी
तिच्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II धृ II

ती रानमाळाची , नागीण हिरकणी
सांज चांदण्याची , ती लवलवणारी पापणी
मधुभाव संगिनी , तू ग किशोरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II १ II

ती फुल रान कळी, निळ्या पलंगाखाली
बोलक्या नेत्राची , ती रानवय गाणी
चंचल मंजुळ , तू ग नवथर लहरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी  II२ II

ती हिरव्या रानाच , पाखर भिरभिरणार
श्रावण रंगाच , ती  इंद्रासय दरबार
मदन गंधाची , तू ग नाच मयुरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II३II

ती लाजाळूची पात , लाजणाऱ्या ओटी
चाफ्याच्या श्रुंगाराची , ती गीत सुमनाची
पुनव चंद्राची , तू ग राघिनी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II४II - सचिन तळे

Saturday 24 March 2012

माझे शब्द मांडले अनेक

ती मावळून पेटली , वनव्या परी अंग अंग
मी जाळ होऊनी विझलो , घेऊन तिचे छंद अनेक

ती भर उन्हात सावल्यांचा , खेळ मांडते नव्या गीतान
मी त्याच गीतांच्या लहरीचा , छेडीतो  सूर-सेतू अनेक

ती क्षणभर थांबते , घेऊन सुसाट वादळी लाट
मी त्याच वादळावरी , कोरिले चित्र तिचे अनेक

ती रंगाहून रंगते , सजवून श्रुंगार अंतरंग
मी त्याच श्रुंगारात  बुडवली , नशेत रात्र रात्र अनेक

ती प्रीत विझूनी गेली , कळपात नव्या रुपानं
मी त्याच रूपावर , रक्तातून काव्य सांडले अनेक

ती विरली काळजात , विरहाच एक रोप पेरून
मी त्याच पाना पानावरी , माझे शब्द मांडले अनेक - सचिन तळे

Sunday 18 March 2012

राजकारण म्हंटल कि चिड चिड होते …


राजकारण म्हंटल कि चिड चिड होते  …
एक होता कामकरी , कष्टाने रोज रोज घामगाळी , सुखाने खायचा भाकरी , वय होत ६० च्या घरी . भेटला होता वाटेला ,वडाच्या  झाडा कडेला , चेहरा होता तापलेला , कोणावरी  तरी होता चिडलेला. झिजली होती चप्पल जणू चकरा मारून मारून , हाथात होती पिशवी कागदपत्रांनी भरलेली . जाणिले होते मी हि हे मनी , अन विचारले बाबास मी , बाबा म्हणाले ...
राजकारण म्हंटल कि चिड चिड होते , मनात राग हळूच फुलते , उमटते डोळ्यासमोर फक्त ह्या नेत्यांचे चित्रे , कधी न विसरणारे , तेव्हा आठवते ,एक काळी आपणच ह्यांना आदर्श मानले होते , आले होते दारी , घेऊन मतदानाची पोटरी , त्या पोटरीत मत आपणच दिले होते . अनेक रंगाचे झेंडे घेऊन , चिन्हांचे बिल्ले मिरवत , प्रचारात आपणच फिरलो होतो . ताई- माई -आक्का म्हणत बोंबा मारले होतो , एक एक वडापाव वरती सारी भूक होती विजवली .बंक मारले होते , शाळा व कॉलेजचे , कामावरून सुट्टी घेऊन रोज रोज पक्ष्याच्या कार्यालयात रात्र - दिवस होते काडले. घर दार सर्वच होते पेटले , ईतक होत मनात हे राजकारण भिडले .आशा होती त्याची हि निराशा झाली , कोण कुठला तो उमेदवार , बाशिंग लाउनी रिंगणात , जिंकून आल्यावर त्याने हि पाटमोरी दाखवली , आता राजकारण म्हंटल कि खरच चिड चिड होते . 
“ अरे लेकरा ” , नको नको हे राजकारण , जरी म्हणतो बर ते आपल घर दार , तर सकाळ संध्याकाळ , वृत्तपत्रात व टीव्हीवर ह्यांच्याच बातम्या पाहतो , अन चार चौघात , गावाच्या वेशीला , त्यांच्याच रंगत रंगतो , मंग कधी कधी हि राजकारणी भेळ अशी काही तिखट गोड होते कि , मैत्रीत हि गट बाजीचे हळूच मिट पडते. भाव भावाचा होतो वैरी , सत्याच्या खुर्ची पाई , लाल रक्ताचे गुलाल उधळले जाते , भारतीय संस्कृतीच्या करून चिंध्या चिंध्या असे हे राजकारण शिकवले जाते . नको नको म्हणता परत राजकारण च समोर येते . अन सरकारी खात्याच्या हर एका कागदावर , ह्यांचीच गरज भासते , आजू बाजूच्या बडव्यांना चार चारावे लागते . दहा चकरा मारून नंतर मंग हि जीवघेणी सही उमटते . झिजते चप्पल आपली तरी त्यांचीच वाह वाह करयाची असते , ज्याला त्याला सलाम ठोकत , सरकारी काम जे पूर्ण करयचे असते. काय करणार , सरकारी कामाशिवाय कुठलेच पान हालत नाही. रेशनीग खात , जल खात , वीज खात ई . हे विभाग ते विभाग , कंत्राटात  हि त्यांचीच दादागिरी चालते , खरचं राजकारण म्हंटल कि चिड चिड होते
गंभीर होता विषय , विचारात पडले माझे सारे शब्द , कोण बरा ह्याचा दोषी ? विचारले स्वतास मी , तेव्हा कुठे टूब पेटली , अरे मतदार आहे न मी . मंग मीच नाही का ह्यचा  दोषी . सरकार असो वा नसो , रस्त्यावर खडे मात्र कायम आहे , सुविधाच्या नावाखाली असुविधाची शाळा मात्र आहे , शेतकर्याची जमीन विकासाच्या नावाखाली उद्योग -  -पतिच्या पोटी , अन बळीराजा कर्जबाजारी होऊन मात्र फासावर्ती , गाव गावात  विजेचा व पाणीच पत्ता नाही .शाळा व कॉलेजात ट्रस्टी च्या नावाशिवाय जागा नाही . नोकरीत हि वशिले पण नडतो , कोर्टाच्या पायऱ्या चडून चडून सामान्य माणूस थकतो , जितक गुन्हे तुमच्यावर तितके तुम्ही मोटे , सामान्य माणसासाठी सारेच नियम खोटे . कसाब व अफजल ला रोज रोज बिर्याणी अन पोलिसांच्या पदरी  २४-२४ तास रात्र दिन पाळी . परत पाच वर्षाने तेच दिवस उजाडते , हेच सारे प्रश्न घेऊन राजकारणी लोकांची फौज येते ,अन परत मंग एकदा हे राजकारण म्हंटल कि चिड चिड होते.
अन परत मंग एकदा हे राजकारण म्हंटल कि चिड चिड होते.

    - सचिन कृष्णा तळे

भूलण्यास तुझे प्रीत गंध ....


सावरले मनास आज , फुलवुनी नवा साज 
ओंजळीत घेतले फुलास , भूलण्यास तुझे प्रीत गंध …

तू नाही आस पास , नाही आज छळतात तुझे भास
स्पर्श आंधळे झाले , झाली पुसट दोघांची रास
दूर दूर या वाटाण वरती , दिसू  लागली तू अनोळखी
तो फुलण्यास येतो . भूलण्यास तुझे प्रीत गंध ....

का उगाच हा रुसवा , का उगाच हा दुरावा
रुद्यात माझ्या मावळला , आज का तुझा चेहरा
सखे सांग ना कळ्यानस या , फुलेना तुझ्या विना
तो बहरण्यास येतो , भूलण्यास तुझे प्रीत गंध ....
कसे आठवांचे ठसे , पुसले सागराच्या कुशीत
का डोळ्यांतल्या अश्रुचे , वादळ मी केले मुठीत
किती क्षण हे उमटले , विरहाच्या पाना पानात
तो शोधण्यास येतो , भूलण्यास तुझे प्रीत गंध…
आता नको परत प्रेमाचा , फसवा खेळ सारा
एकटाच ह्या काव्यात मी , एकटाच माझा किनारा
पण रुद्यात अजून जळते , तुझ्या भेटीचा विसावा
तो एकांतास येतो ,  भूलण्यास तुझे प्रीत गंध…      - सचिन कृष्णा तळे