माझे फोटो

Saturday, 30 July 2011

एक होता कवी ...

एक होता कवी
वाटेवरचे शब्द , शब्द तो वेची
जिथे नव्हता पोहचला रवी
तिथे पोहचला हा गडी ...एक होता कवी...

एके दिवसा , गेला शब्दांच्या गावी
शब्दसागरात नाहून , बसला कवितांच्या घरी
कवितांच्या घरी होती , शब्दांची न्याहरी
न्याहरी करता करता , झाला तो कवी ... एक होता कवी ...

पहाटच्या कीरणातुनी , आली एक परी
परीच्या भोवताली , त्याच्या शब्दांची नगरी
नगरी होती सजली , एक एक शब्दांनी
शब्दांमधी प्रेम ओतून , झाला तो हो कवी ..एक होता कवी ....

मेघांची गर्दी झाली , आली वादळी
वादळी लाटामध्ये , हरवली ती परी
परीच्या विरहाने , शब्द शब्द रडले हर क्षणी
क्षणामध्ये एकांत रुसली , अन जाहला तो कवी... एक होता कवी ....

काय म्हणावे शब्दांना , विचारांच्या नभाना
नभामधुनी शब्द सरी आल्या , आल्या कवितांच्या दारा
दारावरती बसुनी त्याने , संपवले स्व शब्द नभी
तरी भुवनी या शब्दांनी , जिवंत ठेवले त्यास जगी...असा एक होता कवी ...

रचले त्याने आसे काव्य , भिडले सर्वांच्या हृदयी
हृदयीच्या कंपनातुनी , मिळाले काव्यास सुराची भूमी
सुरांच्या भूमी मध्ये , कवीचे नटरंग रूप सजले
सजलेल्या त्या रूपांमध्ये , चमकला असा एक कवी ...असा एक होता कवी

सचिन तळे  29/07/2011

Wednesday, 27 July 2011

तू आता सगळ विसरली असशील ....


तू आता सगळ विसरली असशील ....
तो पाउस , तो मोहक वारा, तो आपला किनारा ...
तुझा माझा होणारा स्पर्श , शब्दांचा पिसारा ...
आठवणी हि आठवता आठवता बुजल्या असतील ...
तू आता सगळ विसरली असशील ....


मंदिरावरच्या पायऱ्या...
पायऱ्या वर माझी वाट बघत बसणारी ती वेळ ...
तुझ्या त्या नजरा , मनाची घाळमेळ...
तुला माझी आवडणारी कविता ..कवितातली शब्द
शब्द शब्दात उमटणार तुझं चित्र...
आता, चित्र हि तुझ्या विना बेरंगी झाली असतील...
तू आता सगळ विसरली असशील ....


मी हि , हो मी हि ...
विसरण्याचा प्रयत्न करतोय , तुझं सारख...
तू मला सहजच विसरली , पण तुला विसरन अवघडच होतय...
कस विसरू ? तुझे ते डोळे , डोळ्यातील काजळ ...
मला बघून लाजणारे ते शब्द , गालावरच हास्य ...
तुझ्या केसात दरवळणारा तो चाफाफुल...
तू दिलेलं ते गुलाबच नूर , त्याची ती पाकळी...
आता हि, पाकळी हि तुझ्याविना सुकल्या असतील ...
तू आता सगळ विसरली असशील ....

आठवतय तुला , ती संध्याकाळ ..
संगतीने चालणारे ते पाऊल , ती वेगळीच चाहूल ...
तो मावळणारा सूर्य , सोनेरी किरण , एकांतात फीरण ...
रडन , बोलन , हसन व एकमेकांना फसवण ...
नाही आठवणार तुला सगळ , कारण
कारण , तू आता सगळ विसरली असशील ....

  
- सचिन तळे 27/07/2011

 

Tuesday, 26 July 2011

पहाटसमई सूर्यकमळ मी पाहतो.....पहाटसमई सूर्यकमळ मी पाहतो
मज शब्दांनी सकाळ आज मी चाळतो
मखमलीच्या स्वप्न चादरी वरी
साखरझोप मी माझीच तोडतो
पहाटसमई सूर्यकमळ मी पाहतो

स्वप्नाच्या या रंगबेरंगी दुनियेत
स्व स्वप्नात स्वताला शोधतो
भेटतो , बोलतो , चालतो , अन हळूच
साखरझोप मी माझीच तोडतो
पहाटसमई सूर्यकमळ मी पाहतो

दूर कुठल्या पक्ष्याची चिवचिवाट ऐकुनी
मिटलेल्या पापण्याला हळुवारपणे सावरतो
गार , गार , ह्व्याच्यासवे मोहरतो , अन हळूच
साखरझोप मी माझीच तोडतो
पहाटसमई सूर्यकमळ मी पाहतो

 
अलगतच दूर करतो स्वप्नातल्या परीला
निरोप देतो अनोळखी मित्रांना
हाताचा फुलवतो पिसारा , अन हळूच
साखरझोप मी माझीच तोडतो
पहाटसमई सूर्यकमळ मी पाहतो
- सचिन तळे  26/07/2011

Monday, 25 July 2011

प्रेमाची व्याख्या आहे तरी काय ?....प्रेमाची व्याख्या आहे तरी काय ?
शब्द शब्दाला मी आता सांगणार तरी काय ?

प्रेम असते विश्व , प्रेम असते सर्वस्व
प्रेम असतो पाऊस , प्रेम असतो हाउस
प्रेम असते आकाशातील चांदणे
लुक लुक करणारे मनातले तारे
प्रेमात नक्की नसते तरी काय ?
प्रेमाची व्याख्या आहे तरी काय ?

हसवणे हि प्रेमातच , फसवणे हि प्रेमातच
डोळ्यातील अश्रुना धारा हि प्रेमातच
प्रेमातच घडते कळत , नकळत सारे
प्रेमामध्ये बेधुंद , अनेक दिवाने
प्रेमात नक्की असते तरी काय ?
प्रेमाची व्याख्या आहे तरी काय ?

विश्वासाच नाव प्रेम , मनातल गाव प्रेम
सुख दुखात घालमेळ , करतय प्रेम
प्रेम असते नजरेच खेळ
कधी गोड तर कधी तिकट भेळ
प्रेमात नक्की रुजत तरी काय ?
प्रेमाची व्याख्या आहे तरी काय ?

वाट बघत बघत ,स्वप्ने रंगवणे हि प्रेमातच
चालता चालता , पाऊलखुणा उमटवणे हि प्रेमातच
नसताना असण्याचे , भास हि प्रेमातच
श्वासाला श्वास , भिडणे हि प्रेमातच
प्रेमात नक्की चालते तरी काय ?
प्रेमाची व्याख्या आहे तरी काय ?

- सचिन तळे  25/07/2011

Friday, 22 July 2011

मम शब्दावली....


हे शब्दघना परी , कळी कशी उमलली
या कळी भोवताली ,रसिकभुंगा श्रावणकाळी

कोणी शिंपडले मजशब्दावरी , अमृताची बोली
शब्दमंथन घडले आसे , मिळाली मम शब्दावली

अलंकारचित आली, आली शब्दांची जननी
शब्दहार वाहिले मी , तिच्या चरणी

या ईश्वरासम जनितो मी , मी शब्दसंजीवनी
मृतास हि जागविते , शब्दमृतुन्जय या भुवनी

या शब्दांमधी भासते , राग , आग , वैराग मनी
या शब्दांमधी बोलते , कडूलिंबातली गोडवी
या शब्दांमध्ये चालते , पाउलवाटा स्वर्गापरी
या शब्दांमध्ये रांगते , लहानपणातल्या आठवणी
या शब्दांमध्ये फुलते , दोन जीवांचे प्रेमनभी
या शब्दांमध्ये हसते , चैतन्याची पहाट अंगणी
या शब्दांमध्ये नाचते , हर्षाने मयुराची सरी
या शब्दांमध्ये गाते , कोकीळ मंजुळ गाणी

सचिन तळे  22/07/2011

Thursday, 21 July 2011

हि कोण ती ...


हि कोण ती ...जी हळूच , चांदण्यात नाहते
हि कोण ती... जी लपून , पिवळ्या उनात मोहरते
हा मावळता सूर्य , तो उगवता चंद्र
सांज नभी , ती एक रानफुल ..हा ती एक श्यामफुल ...
पहिले मी , मी एक सांजफुल...

हि कोण ती ...जी अलगत , पायवाटा चोरते
हि कोण ती ...जी कळत , नकळता बोलते
हा कोसळणारा पाऊस , तो भिजणारा वारा
सरी संगे , ती एक सूर्यफुल...हा ती एक चिंबफुल...
पहिले मी , मी एक चाफेफुल ...

हि कोण ती ...जी कृष्णास , भुलवते
हि कोण ती ...जी माधवास, चोरून पाहते
हा गोकुळचा कृष्णा , तो बासुरीचा पान्हा
प्रेम रंगे , ती एक राधेफुल ...हा ती एक गवळण फुल
पहिले मी , मी एक प्रेम फुल ....

हि कोण ती ...जी नसताना हि , असते
हि कोण ती ...जी येताना स्वप्ने , रंगविते
हा नभातला इंद्रधनुष , तो उडणारा पारवा
स्वप्नातले , ती एक कळीफुल... हा ती एक राणीफुल
पहिले मी , मी एक स्वप्नफुल ...

सचिन तळे 20/07/2011

Wednesday, 20 July 2011

कसा कवटाळू हे शितीज नवे ....


शितीजांचे अंतर मी आज पहिले
म्हणाले मला , शितीज, कवटाळून घे
मी परी एकटा ,उडणार्या पारव्याने
मज नाही दिशा, गुरुविन जीवन माझे ...सांग कसा
कवटाळू हे शितीज नवे ...

दऱ्या खोऱ्यातून लपून पाहे , शितीज हे
पायी दगडांची न काट्यांची मनी भीती वसे
हे शितीज मला दूर गावातून दिसे
मज पाशी नाही पाउल खुणा ...सांग कसा
कवटाळू हे शितीज नवा ...

शितीज बसले आसनावर , खुणवे लवकर ये
जरा थांब म्हणालो शितीजास, हे मार्ग मज नवे
मी स्व घाम गाळत, येणार तुझ्या सवे
पण मार्गी हजार वाट मज दिसे समोरे ...सांग कसा
कवटाळू हे शितीज नवे ...

पाउला पाउला वरती उमटवतो , मनी नवे ठसे
पेटवतो हर एका एका वाटेवर , नवे दिवे
अंधार असो वा वादळ दिसो, मज न भीती त्यांचे
मज फक्त हात हवे , श्री कृष्णाचे ...सांग कसा
कवटाळू हे शितीज नवे ...

- सचिन तळे १९/०७/२०११

Tuesday, 19 July 2011

शब्दलंकार....


शोधितो स्वतास मी , मम शब्दांनी
पाहतो स्व मित्र मी , सम शब्दांनी
रेखीटतो चित्र मानसी , रंग शब्दांनी
खेळतो खेळ आसे , बहु शब्दांनी
हे शब्द जसे , श्रुंगार आसे , माझे अंगणी ...

मी शब्दांच्या गावी , आज पाहुणा बनून आलो
मज भावली हि नगरी , मी शब्द शब्द झालो
माझी दिशा कुठे फिरकली , मी अंतर मुग्ध जाहलो
माझ्या सारख्या शिळेत, शब्दलंकार घडलो ...

छेडीतो मी स्वर असे , गीत शब्दांनी
वाजते पैंजण जसे , ताल शब्दांनी
नाचते नट रंगी अंगी , स्वर्ग शब्दांनी
गातो मी गाणे रंगी , अंत शब्दांनी
हे शब्द असे , वस्त्र नवे , माझ्या भुवनी ...

सागरच्या लाटावर्ती , शब्दांना मी पाहिले
कड कडत्या विजांमध्ये , शब्द सरीने चमकले
माझी प्यास भूक शब्द शब्द ,मी शब्द शब्द पूजिले
माझ्या सारख्या निवडुंगात , शब्द फुले उमलले ...

सचिन तळे १९/०७/२०११

Monday, 18 July 2011

सिंह गर्जतो...सिंह गर्जतो , गर्जतो हा बोलतो
महाराष्ट्राची , ललकार फोडतो ...

सह्याद्रीत शिव रूप धारतो
हिंदवी स्वराजाचा पताका डोलतो
भगव्याची तो शान राखतो
धर्म , पंत , जात , मराठी मानतो
देशाश रक्षणास सदा चालतो
महाराष्ट्राची , ललकार फोडतो ...

चंद्रभागेतीरी विटेवर , संसार मांडतो
संतांच्या अभंगवाणीत , संत डोलतो
अमृताची गोडी , रेड्यात वदितो
गीतेच्या हर एक शब्दात , मराठी सांगतो
वारकऱ्याच्या पाई पाई , दिंडीत चालतो
महाराष्ट्राची , ललकार फोडतो ...

लाल, काळ्या ,मातीत राबतो
शेतामंधी सोनेरी ,दाने पिकवतो
चिमण्या पाखरांच्या सवे, तो गातो
संकटास लढण्यास , स्व समर्थ असतो
कपाळी माती टिळा , मराठी लावतो
महाराष्ट्राची , ललकार फोडतो ...

- सचिन तळे ( 18/07/2011 )रसिक तुझ्यासाठी ...


यावे , बसावे , माझ्या शब्दांच्या भूमंडली
शब्दांची गुलकंद आणिला फक्त , रसिकांच्या प्रेमापोटी
कधी कडवट , कधी गोडवा , ह्यात घोळला
माझे शब्द फक्त रसिक तुझ्यासाठी ...

मी मांडतो शब्द , कधी सुखद , कधी दुखद
जे जानिलो फक्त तुमच्या , रुद्यातून
शब्द फिरकीने , घेऊन जातो आठवणीच्या गावी
माझे शब्द, फक्त रसिक तुझ्यासाठी ...

मी अनुभवतो , पाहतो , चित्र नवे
हर एका चित्रात रंगवतो , शब्द नवे
ह्या ईश्वरासम मानतो , शब्द रसिकांती
माझे शब्द, फक्त रसिक तुझ्यासाठी ...

मज म्हणे कोणी वेडा , शब्द किडा
मज परवा न ह्यांची , भोगितो मी पिडा
मज अंती एकच चिती , मी रसिक वेडा भुवनी
माझे शब्द, फक्त रसिक तुझ्यासाठी ...

रसिक जन हो , ऐसा छंद असो
तुमच्या छंद मुळे , काव्यातील कवी जगो
एकच मागणे ईश्वर चरणी , कला असो वसो सर्व ठाई
माझे शब्द , वाहतो आज , रसिक तुझ्या चरणी...
फक्त रसिक तुझ्यासाठी ...

- सचिन तळे ( 18/07/2011 )

Sunday, 17 July 2011

मी शब्दांच्या आठवणीने ....


शब्द आज तुटले माझे ,त्या आकाशातल्या तुटत्या ताऱ्याणे
जणू आभाळ कोसळले , तुझं माझ्या जीवनातून जाण्याने

प्रीत अशी जुळली होती सखे , तोडले तुनी ते बंधन कायमचे
आज जीवन माझे , प्रणाविना शरीर जसे

जाता जाता आठवणी तुझे , देऊन गेली मला एकांताची चित्रे
जीवन रंगी चित्रे माझे , माझ्याच डोळ्यातील अश्रुने निसटले

विचार तुझे मनात माझे ,जसे वादळी लाटणी, श्रावण बरसे
बिन मेघाचे आभाळ गर्जे , तसे शब्द माझे ,तुझ्यावीण तरसे

मी घायाळ झालो आज , मज नाही जवळ कोणी, या नभी सांज
मी शब्दांच्या आठवणीने , तुला जागवित , रोज मनात

एकदा तरी येशील तू , विचारपूस माझी करशील तू
जवळीक येता माझ्या सवे सखे , हे सारे जग भूलशील तू

- सचिन तळे ( 17/07/2011 )

Saturday, 16 July 2011

नटराजन वंदना ......

स्वर नभाच्या, स्वर चरणी ,वाहिले मी शब्द नभी
कलेच्या त्या नटरंगी , प्रणाम माझा, मज शब्दांनी
मी इतका अनुहून छोटा , विश्वकलेचा, छंद जोडता
शब्द स्वराच्या वाटेवरती, पाऊल माझे, अडखळत पडता
शब्दांचे डोंगरात चडता , स्वरांचे पाऊसात भिजता
प्रणाम माझा , मज शब्दांनी , कलेच्या नटदेवाला...

मी वृक्षाच्या वेलीत, पानं पानावरील , दवबिंदू छेडीत
शब्दांच्या चालीवरती , स्वरांचे, रंग उधळीत
नटराजनच्या चरणी , शब्दचाफ्याचे, फुले वाहता
प्रणाम माझा , मज शब्दांनी , कलेच्या नटदेवाला...

मी ज्वलंत सूर्यमंडली, शब्द परी, चंद्र कोरती
नभ गंगेच्या अंतरी , अनेक तारे , स्वराने चमकती
कलेच्या त्या वाहत्या प्रवाहात , शब्दरुपी पाय रुजविता
प्रणाम माझा , मज शब्दांनी , कलेच्या नटदेवाला...

मी मयूरपीस रंगवीत, शब्द पिसारा फुलवीत , स्वरनृत करता
कोकिळेच्या स्वरात, मृग कस्तुरीत ,जंगलात शब्द मांडता
कलेच्या या मैफलीत , रसिक गंधात , शब्द सांडता
प्रणाम माझा , मज शब्दांनी , कलेच्या नटदेवाला...
- सचिन तळे ( 15/07/2011 )

Friday, 15 July 2011

आजुनी दडपली आहे पहाट
काळ्या भोर रात्रीच्या गंधात
सूर्य फेकेना किरणे सोन्यात
भीती गडद आजून हि माझ्या मनात ...
कारण ,आजून हि दडपली आहे माझी पहाट ...

मी पहाटची दिशा पाहतो निरखून
पहाट मला पाहते हळूच लपून
तुझ्या लख लख प्रकाशाने उजळू दे
दीप माझ्या जीवनातल्या , अंधारात
या अंधारात कसा देऊ लढा जीवनात
कारण , आजून हि दडपली आहे माझी पहाट ...

मी वाट पाही तुजी एका अनोळखी वेळी
मला वाटते मनी , तू भिलास या राती
बघ माझ्या कडे, मी उभा दारात फक्त तुझ्यासाठी
पहाट , तुझ्या कडे आहे सप्तरंगाचे धनुष
कर वार , मी नाही समर्थ ह्या रात्रीत
कारण , आजून हि दडपली आहे माझी पहाट ...

आली आहे वेळ , संपवण्या रात्रीचा खेळ
उटव हळूच , चिमण्या पाखरांची डोळ
पाहू दे आम्हास श्री मुख कमळात
कसा पाहू मी , कसा सावरू स्वताला , कारण
आजून हि दडपली आहे माझी पहाट ...


- सचिन तळे (14/07/2011)

Thursday, 14 July 2011

माझ्या माय देशात....

माझ्या माय देशात
माझ्या माय देशात , सोने पिकती हजार
सोन पिकवणार्या, त्या शेतकऱ्याचे , मरण हजार ...
आरे, माझ्या माय देशात , स्त्री माये समान
स्त्री शक्ती महान , तरी स्त्री हत्या, करती हातान

आरे, माझ्या माय देशाची , माती पारस वाणी
इथे जन्मले काही , कावळ्याच्या जाती
टोचा मारती मारती , गरिबांच्या पोटी
राजकारणची चपाती , एक मुखाने हे खाती ....

आरे , माझ्या माय देशाची , संस्कुती स्वर्गा परी
इथे तांडव चालते , लबाडीच्या घरी
घाम गाळतो गाळतो , भर उनात शेतकरी
त्याच्या पिकाचीही गिनती , ब्र्हष्ट नेत्याच्या दारी .....

आरे , माझा माय देशी , भूमी देवांची
कुठे संतांची अभंगवाणी , तर कुठे चाले मारामारी
साता समुंद्र पलीकडे , माझ्या माय देशाची प्रचीती
आन माझ्या घरातच चाले , भावा भावाची अघोरी वृत्ती ...

आरे, माझ्या माय देशात , तरुणाची लाट
सर्वात हुशार , तरी त्यांना बेकारीची साथ
शक्ती व युक्ती ने , देतील हे उत्तर
तरी लुबाडीत आहे , ह्या तरुणास काही, मांजराची जात ...

या माझ्या माय देशाचा आभिमान मला वाटे
काळजात ठोके वाडती, जेह्वा पाहतो चित्र हे
स्वाभिमानाची पताका , डोली आमच्या माथ्यावरी
तरी विकाया निघाले , माझ्या माय भूमीस
माझ्या माय देशाचे च पुढारी , माझ्या माय देशात...

- सचिन तळे ( 13/07/2011 )

Wednesday, 13 July 2011

काही नाते....


नकोच मनता, मनात माझ्या एकच चिंता दाटते
हर एका नात्यामध्ये आभाळ माझे गर्जते ...
जुळतात तरी कसे हे अलगत नाते
नात्याच्या स्वप्नात का गुणगुंते नवे गाणे ...
तुटतात काही नाते , क्षणात हळवे होणारे
इतके जवळ असुनी , का तुटते हे नाते ...

नात्याला हि एक नाव आस्ते
नात्याला हि एक गाव आस्ते
फुलणाऱ्या फुलाशी हि आस्ते नाते
आन दुखातल्या वादळाशी हि लडते नाते
या नात्यालाही अगणित आस्ते काटे
कधी रकक्षण करणारे , तर कधी टोचणारे
इतके अतूट असुनी , का तुटते हे नाते ...

नाते जुळतात मनाच्या सागरात
नाते हसतात , नात्याच्याच गावात
शंका घालते नात्यावर हातोडा
जुळवताना होता विश्वास , तुमचा माझ्यावर थोडा
आज काय घडले माझ्या हाती
हाय , हे नाते कसे तुटले , माझे माझे म्हणुनी
इतके जवळीक असून हि , का तुटते हे नाते ...

- सचिन तळे ( 13/07/2011 )

Tuesday, 12 July 2011

एक परी स्वर्गातली ...

एक परी स्वर्गातली ...
जशी दूर नभातून गर्जलेली
थोडीशी निराळी , थोडीशी चम चम करणारी
स्वनातल्या गावातून , मनमंदिरी अवतरलेली
आसमंत नभातून , पाउसाच्या सरीतली
अशी ती लाजरी , अशी ती साजरी , अशी ती गोजरी
एक परी स्वर्गातली ...

जशी स्वर्गातून अवतरलेली
थोडीशी नादान , थोडीशी लुक लुक चांदण्यावणी
इंद्र दरबारातून , मदनात आंतरलेली
आकाश गंगेतून , छेडलेली लहेरीतली
अशी ती लाजरी , अशी ती साजरी , अशी ती गोजरी
एक परी स्वर्गातली ...

जशी पाना पानातून नटलेली
थोडीशी हिरवळलेली , थोडशी चिंब चिंब न्याहारलेली
सांज निसर्गातुनी , अंग अंग मोहरलेली
सांज चन्द्रातुनी , आंत आंत प्रकाशलेली
अशी ती लाजरी , अशी ती साजरी , अशी ती गोजरी
एक परी स्वर्गातली ...


- सचिन तळे ( 12/07/2011 )

Sunday, 10 July 2011

सांज वेळी....मज शब्दांनी सांज , आज उमटली
सांज वेळी , सांज आशी , सांज भूलवशी
हर एक सांज वेळी , सांज हळूच हसली
सांज शब्दांनी, काय म्हणावे सांजेस मी
आज सांज सूर्यसमचंद्र , प्रेम नभाने सजली
म्हणे, हि सांज आशी ,कि अंत मनात निजली ...

हि सांज देते कधी सुखाचा इशारा
देते कधी हळुवार वारा , तर
कधी पाउसाच्या रिम झिम धारा
सांज देते कधी भयान रात्रीचा दरारा
सांज लपे भर दिवसातल्या तळपत्या दुपारा
म्हणे , हि सांज आशी कि अंत मंताला किनारा ...

तरुणाईच्या वाटेवरती , सांज वेळी कट्टा
दोन जीवांच्या प्रेमाची होते , सांजेसम थट्टा
एकांत मिळते , सांज खेळते , घेऊन नवा हट्ट
कृष्ण आन राधाचे , सांज बासुरीत , सांगती नेत्र
शोधीत आसतो , सांज नभी , मी नवी चित्र
म्हणे , हि सांज आशी कि , अंत मनातल मित्र...

सांज देते आठवण हर एका वितळलेल्या काळाची
सांज लपेटून घेती आपल्या पिलास पंखाखाली
सांज देते थकलेल्या हातासाठी विश्रांती
सांज खुनवते प्रीयसीस , प्रियकर घरी येण्याची
या साजेसं शब्द फुटती , कवीच्य ओटी
म्हणे हि सांज आशी कि अंत मंताला कवी ...


- सचिन तळे ( 10/07/2011 )

Saturday, 9 July 2011

गाणे हे तुमचे ...गाणे हे माझे ....

सा रे ग म , प् ध नि सा सारे रे हे गाणे
ओटावरचे गाणे , गाणे तुमचे माझे
गाणे सजते , गाणे फूलते, हर एक मनाने
गाणे हे तुमचे ...गाणे हे माझे ....

उड़नार्या पखाराच्या , चिव चिवात गाणे
फुलाच्या भोवती , भीर भिरनार्य भुनग्याची गाणे
कोकीळ च्या स्वरात, भिजलेली ती गाणे
नदीच्या प्रवाहात ,सळसळते गाणे
सा रे ग म , प् ध नि सा सारे रे हे गाणे ...
गाणे हे तुमचे ... गाणे हे माझे ....

रात्रीच्या रातराणीत , शीतलतेचे गाणे
शांत शांत काळ्या नभात, चंद्राचे गाणे
सांज वेळी फिरकलेल्या , पारव्याची गाणे
चम् चम् करणार्या, त्या काजव्याची गाणे
सा रे ग म , प् ध नि सा सारे रे हे गाणे ...
गाणे हे तुमचे ... गाणे हे माझे ....

प्रेमाच्या दिशेने , मोहारलेली गाणे
मैत्रीच्या संगतीने , बहरलेली गाणे
दुखाचे गाणे ..., आन सुखाचे हि गाणे
शिळेलाही पाझर फोडती , शब्दांची गाणे
सा रे ग म , प् ध नि सा सारे रे हे गाणे ...
गाणे हे तुमचे ... गाणे हे माझे ....

घरातल्या भांडीत हि , वाजते गाणे
शेतात राबणाऱ्या , शेतकर्याचे गाणे
उगवलेल्या कंसाच्या, दाना दाण्यात गाणे
पाउसाच्या हर एका , सरी सरीत गाणे
सा रे ग म , प् ध नि सा सारे रे हे गाणे ...
गाणे हे तुमचे ... गाणे हे माझे ....
- सचिन तळे ( 09/07/2011 )

Friday, 8 July 2011

मी एकटाच, एकांतात....


एकटाच, एकांतात बसलो मी झाडाखाली ग
वनराई माझ्या भोवताली , आसपास कोणी नाही ग
फिरकत होते पाखरे , तुझ्या आठवणी त ग
या निळ्याभोर नभात, रूप तुझे दिसते ग ...

गार गार वारा हि सैर वैर धावत होते
वार्याच्या सोबतीने पाने हि खेळत होते
तमाम सारी हि सृष्ठी , माझ्या भोवताली असून हि
मी मात्र क्षणा क्षणाला , तुझ्या आठवणीत भिजतोय ग ...
एकटाच, एकांतात बसलो मी झाडाखाली ग ...

छंद होता जीवनाचा ,तो छंद आज तोडतोय
मंद मंद शब्दांचा , पिसारा माझ्या रंगे फुलवतोय
कवितांचे गंध आज , मी कसे छेडले ग
या कवितांच्या गंधामध्ये तुझ्या आठवणीची मैफिल रंगली ग...
एकटाच, एकांतात बसलो मी झाडाखाली ग ...

दूरच राहिले मित्र सारे , घरदार हि दूर ग
ओटानवरच्या शब्दांना , लेखणीची साथ सजली ग
लेखणीत उमलले कसे शब्द हे , मला च नाही कळले ग
या लेखणीत माझिया , तुझ्या आठवणी उमटले ग
एकटाच, एकांतात बसलो मी झाडाखाली ग ...

सांज वेळी , एकांतात , पाऊसाची सरी आली ग
मनात माझ्या चिंब चिंब , भिजण्याची चाहूल झाली ग
भिजताना या पाउसाच्या थेंबा मध्ये , डोळ्यातील थेंब मिसळले ग
माझ्याच आभाळाची भीती , मलाच आज वाटू लागली ग ,
एकटाच , एकांतात परत झाडाखाली बसलो ग ...


सचिन तळे ( 08/07/2011 )

Thursday, 7 July 2011

एक थेंब......

किती हि बंद केले मी माझे पाप्ने
किती हि सावरल मी माझ्या मनाने
थेंब तुझ्या येण्याने , विसकटले डोळ्यातील थेंब सारे
थेंब नको नको म्हणताना , थेंब आले पुरावानी
भिजुनी गेले मला थेंब , ओले चिंब झाले अंगणी
पण , हर एका थेंबाचा अनुभव वेगळा
हर एका थेंबाचा थाट आगळा
म्हणून थेंब आसवे जीवनात हजारदा
हजारदा सुखात तर एकदा दुखात दिसणारा

थेंब स्वागताचे असतात ,थेंब दुखाचे रडतात
थेंब थेंबा वरती ,आठवणी भिजतात ...

थेंब हर्षाने नाचते , थेंब मोहरून फुलते
तेच्या पाना पानावरती , थेंब दवबिंदूत सजते ...

थेंब असताना हि नसते , थेंब प्रेमात विरघळते
भावनाच्या हर एका शब्दात , थेंब जीवात घूसमळते ...

सागराच्या लाटेत थेंब , पाउसाच्या सरीत थेंब
थेंब असतात शब्द , चिंब भिजवणारे ते थेंब ...

डोळ्यातील आरसा थेंब , पोटातील भूक थेंब
थेंब क्षणा क्षणा मध्ये गुंतवणारा तो थेंब ...

स्वाशाला भिडवनारे ते थेंब , गगनाला रडवणारे ते थेंब
अंतकरणाच्या काजळाला , पाझर फोडणार थेंब ...

थेंब असावे अन नसावे , थेंब अलगत पुसावे
हर एका थेंबा मधी , अलगत आठवणीत घुसावे ...

- सचिन तळे ( 07/07/2011 )

Wednesday, 6 July 2011

एक नाव होत , माझ्या जीवनात ...

एक नाव होत , माझ्या जीवनात ...
सुंदरस गाव होत तीच, माझ्या जीवनात ...
माझी सकाळ तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याने ...
माझी दुपार तिच्या हर एका शब्दाने ...
माझी संध्यकाळ तिच्या सहवासाने ...
अलगत अश्या , हव्याच्या झोक्यावणी दिवस माझा येयचा व जायचा ...
आता तीच सकाळ , तेच दुपार , ती संध्याकाळ...
दिवस रमतोय फक्त तिच्या आठवणीच्या गावात ...
खरच , एक नाव होत , माझ्या जीवनात ...

आठवतीय ती , हर एक संध्याकाळ ...
हर एका पाऊलावरती वितळलेला तो काळ ...
स्वछंद अस ते नभ , आन सुंदरस तुझं रूप ...
उडणार्या पाखराला हि भुलवणारा तुच ते आवाज ...
माझ्या श्ब्दांवर्ती , स्मित हास्य करणारे ते ओट ...
आठवतीय , तुझ्या आठवणीची हर एक गोष्ट ...
सांग , एकांत कसा भिडला आज तुझ्या गावात ...
खरच , एक नाव होत , माझ्या जीवनात ...

तू आता दूर आहेस माझ्या किनार्यापासून ...
तुझ्या सागरी लाटा , फिरकल्या नाही आजून ...
किनार्यावरती नजरा बसले आहे टिपून ...
सागराला हि भिजवतोय आज, मी माझ्या आश्रुतून ...
पुसल्या त्या सर्व आठवणी , मी माझ्या रुद्यातून ...
पुसताना , हजार जखमा दिले, मी स्वताला, माझ्या शब्दातून ...
आता , भलत्याच दिशेला मी गेलो असा वाहत...
खरच , एक नाव होत , माझ्या जीवनात ...
- सचिन तळे ( 06/07/2011 )

Tuesday, 5 July 2011

युक्ती ....

गिरीष हा मूळचा मुंबईचा , कामा निमिताने तो पुण्यात त्याच्या कंपनीतल्या ( सलीम ,अमोल व युवराज) या मुलांबरोबर राहत आसे .एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळे सर्व जन एकत्र कामावर जायचे व एकत्र येयचे . गिरीष ने पुढच्या शिक्षणासाठी मेनेजमेंट च्या पदवीसाठी घरन रोख २५००० रुपये आणिले होते . ते गिरीष ने आपल्या कागद पत्रसाहित ते रक्कम आपल्या कपाटात ठेवले .कामावरून संध्याकाळी गिरीष व त्याचे मित्र घरी परतात , उद्या addmision घेयचे म्हणून गिरीष आपले कागदपत्र व रक्कम घेयला कपाट उघडतो ,कपाट उघडता क्षणीच गिरीष ला त्याचे कागद पत्र थोडेसे विस्कटलेले दिसते व रक्कम हि जागे वर दिसत नाही . तो थोडासा गोंधळतो ,रक्कम चोरी गेली ...पण नक्की रक्कम कोणी चोरली असावी , आपले मित्र तर आपल्या सोबतच होते ...त्यांच्यावर संशय घेण हि चुकीच .मंग करायचं तरी काय . थोड्या वेळानंतर गिरीष त्याच्या रूम मालक ( काका ) व मित्रांना सोबत घेऊन रक्कम चोरीला गेलेली सांगितलं .पोलिसात तक्रार केली तर काकाच नाव खराब होणार होत , म्हणून काका ने आगोदर सर्वाना आपली कपाटे तपासण्यास संगितले ,चुकून कधी रक्कम ठवली गेली असावी म्हणून . सर्व मित्रांनी आप आपली कपाटे तपासली पण रक्कम मिळाली नाही . अखेर जवळ च असलेल्या पोलीस चौकीतल्या इन्स्पेक्टर शिवाजी साटम यांना कळवायच ठरल . इन्स्पेक्टर शिवाजी साटम यांच्या जवळ ह्या बाबतीत तक्रार केली . तक्रार केल्या नंतर इन्स्पेक्टर शिवाजी साटम यांनी सर्व मित्रांची व्यक्तीत चौकशी केली , पण ह्या पैकी कोणीही रक्कम चोरली नसावी असा अंदाज शिवाजी साटम यांनी लावला , थोडा वेळ विचार केल्या वर गिरीष ने आपल्या मित्रांना विचारले . आपण काम वरून घरी येई पर्यंत कोणी इथे येत का ..अमोल म्हणाला हो सकाळी पेपर वाला व आपली कपडे धुणारा शामू आणि तो काल आपली कपडे घेण्यासाठी आला हि होता . शामू हा गरीब घराण्यातला मुलगा , त्याच्यावर संशय घेण म्हणजे चुकीच ठरेल . आणि आपल्या काही पुरावा हि नाही . सर्वांच एकच मत होत , कदाचित रक्कम हि शामू नेच चोरली असावी . कारण तोच रूम मध्ये आला होता . त्याच वेळी सलीम ने एक उक्ती सुचवली . का नाही आपण एक व्हिडीओ कॅमेरा लपून त्याला परत बोलूया आणि माझ्या शर्ट च्या खिश्यात ५०० रुपये हि ठेऊया . सगळ्यांना हि युक्ती आवडली , त्यांनी दुसर्या दिवशी शामुला बोलावल व रूम च्या एक कोपर्यात व्हिडीओ कॅमेरा लपवला . शामू आला व कपडे हि घेऊन गेला आणि जेव्हा तो व्हिडीओ कॅमेरा पाहिला, तेव्हा त्यात शामू हा घरात येतो , सर्वांची कपाटे व शर्ट तपासतो आणि सलीम च्या खिश्यातले ५०० रुपये हि घेतो . यावरून शामू नेच ते रक्कम चोरली हे सिध्द झाल . तो संपूर्ण रिकॉर्ड इन्स्पेक्टर शिवाजी साटम यांना दाखवण्यात आला . अखेर गिरीष ला त्याचे सर्व रक्कम परत मिळाली .


सचिन तळे

Friday, 1 July 2011

तुझे मन ....हा माझे मन ....


छम छम , छम छम , पायल वाजे

घून घून , घून घून , घुंगरू वर नाचे
मन हे माझे , हा मन हे तुझे
माझे मन ....नाचे या पाखराच्या सवे
तुझे मन ....गाते ह्या पाउसाचे गाणे
तुझे मन ....हा माझे मन ....

भिर भिर , भिर भिर , आश्या नभाने
अलगत या पाखराच्या स्पर्शाने
मन हे माझे , हा मन हे तुझे
माझे मन ... उडते या गगनाच्या दिशेने
तुझे मन ... झुलते या मंद हव्याने
तुझे मन ....हा माझे मन ....

धुंद धुंद ह्या आसवंत धुक्याने
छंद जुळला तुझ्या सहवासाने
मन हे माझे , हा मन हे तुझे
माझे मन .... बेधुंद होऊनी वळते तुझ्याकडे
तुझे मन .... सममोहनाने क्षणभर फुलते
तुझे मन ....हा माझे मन ....

सर सर , सर सर या श्रावणातल्या सरीने
विसरलो मी तुझ्या नजरेने
मनहे माझे , हा मन हे तुझे
माझे मन .... चिंब चिंब होऊन भिजे
तुझे मन .... मातीच्या सुगंधातून दरवळे
तुझे मन ....हा माझे मन ....

- सचिन तळे ( 01/07/2011 )