माझे फोटो

Thursday, 30 June 2011

आहो आम्ही राजकारणी ..

राजकारण , हा शब्द जरी घरात काडला तर प्रथम तिरस्काराच्या नजरेने बघितलं जात .आजच्या
काळात राजकारंची व्याख्याच सगळ्यांनी बदलून टाकली आहे ." राजनीती " , " राज का रान " ,

" राज कारण " ई . आणि आश्या अनेक चित्रपटात राजकारण म्हणजे दबंग शाई किवा गुंडगिरी
हेच चित्र उमटवल . म्हणून कोणता हि पालक आपल्या पाल्याला राजकारणी हो व देश चालव अस
म्हणत नाही . मंग आपल्या सारखी निस्वार्थी मनाचे तरुण जेव्हा राजकारणात उतरत नाही तेव्हा हे चुकार मनाचे लोक राजकारणात उतरतात आणि आपल्याच अधिकारांवर गदा आणतात , आपण फक्त चार चौघात ह्यांना शिव्यादेण्याच्या पलीकडे काहीच करत नाही .निवडणूक आली कि त्यांनी केलेल्या घोटाळे वर पांघरण घालून त्याला मतदान करतो व साहेब म्हणत त्याच्याच पाटीशी फिरतो .

गेल्या काही महिन्यामध्ये , वारजे माळवाडी इथे एका राजकीय पक्षाची सभा व मेळावा होता . या सभेत केंद्रीय मंत्री व आजी माजी सर्व मंत्र्यांची उपस्ती लागणार होती . साहेब येणार म्हणून त्यांच्या
कार्यकरत्यांनी सभेच्या दोन तीन दिवसा आगोदरच वारजे माळवाडी च्या आस पास शुभेच्या च्या
होर्डिंग झळकावले . हे होर्डिंग पाहता मनात विचार आला नक्की येतंय तरी कोण . " या देशाचा व
लोकशाईचा सेवेकरी का राज्यशाईचा हिटलर " . मला हि उस्तुकता लागली . सभेत स्थानिक लोकांच्ये
प्रश्न सुटतील हाच विचार घेऊन मी सभेला गेलो . केंद्रीय मंत्री येणार म्हणून पदाधिकारी नि गावा
गावा तून बस भरून लोक आणली होती , त्यामुळे स्थानिक लोकांना बसण्यास जागा मिळाली नव्ह्ती. मी हि शेवटच्या टोकाला उभे असलेल्या लोकांमध्ये सामील झालो . जेणे करून मला ह्याचं मत जनता येईल . अव्वा ते सव्वा आसे शब्द फेकत काही पदाधीकारणी आपली भाषणे केली , मंग आजी माजी मंत्र्यांनी ,बघता बघता सभा संपली . सुरुवात पासून ते शेवट पर्यंत फक्त पक्ष्यावर भाष्य झाल , स्थनिक लोकंचे प्रश्न सोडवणार एक भाष्य झाल नाही . डोक्यावर हात मारलं आन निघालो . सर्व काही घडल्या नंतर बोल्याण्याची प्रथा आहे आपल्या इथे . चालता चालता लोकांची कुजबुज ऐकत गेलो , कोण म्हणाल " आमुक आमुक हा गुंड आहे " कोण म्हणे " तो तसाच आहे " तर कोणी " आरे सगळे चोर आहेत रे " , " सगळे राजकारणी एकच काहीच फायदा नाही " . हे सर्व काही मी ऐकत होतो . मनी वाटल ह्या नेत्यांना शिव्या देऊन काय फायदा , ह्या सर्वांचे जिम्मेदार आपण हि कुठे तरी आहोत . आपण त्यांना या जागेवर बसवतो . नक्की लाचार कोण राजा कि  सेवेकरी . लोकशाई राजा असून सेवेकरी राजे झाले . देशाच्या प्रगतीला हातभार लागणाऱ्या संपत्तीची लुट केली , तरी आपण गप्प . मंग हे राजकारणी लोक मनात नक्की म्हणत असतील .
आम्ही राजकारणी , आमची आहे वेगळी करणी ,आम्ही राजकारणी..


ब्रहष्टाचार , आमच्या मनाचा आकार हा
उरात आमच्या चुकार पणा
घडला असा संस्कार म्हणा
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..

घोटाळे आमच्या रक्तात उसळे
लबाडी ची रोज आम्ही कब्बडी खेळे
अंधाऱ्या रात्री चोरटेपणा
हाच आहे आमचा वेगळेपणा
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..

मनात आमच्या रोजच चांदणे
डोक्यावर असतात हजार लफडे
विश्वाष घात हा आमचा पात
जनतेला हवा फक्त आमचा हाथ
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..

तरुणाई ला लढवायच , धर्मावरती भडकवायचं
किसा आमचा कसे भरतील , हेच आमच्या डोक्यात शिजतील
देवाला हि मागे सारती , इतके लाचार हि जनता सारी
आम्हला हे ठाऊक आहे म्हणून , लोकशाईत आमचीच चालती
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..


  - सचिन तळे ( 30/06/2011 )

Wednesday, 29 June 2011

तू हो पाऊसाचे धारे....

तू हो पाऊसाचे धारे

चल पाखरा संगे , झेपऊ आकाशा रंगे
सप्तरंगाने उडऊ , निळ्या ढगांचे थवे
तुला अडवतील ते , काळे टपोरी ढगे
तुला चमकवतील ते , पछाडलेले विजांचे तारे
तू हो पाऊसाचे धारे , बरस एकदा साऱ्या किनारे ...
चल पाखरा संगे...

चल आगीच्या अंगारे , पेटवुया वणव्याचे मळे
तळपत्या आश्या वनात , फुलउया शितीजाचे फुले
तुला टोचतील ते , काटेरी झुडपे
तुला भूलवतील ते ,घनदाट जंगले
तू हो पाऊसाचे धारे , विझून टाक सारे वनवे ...
चल आगीच्या अंगारे...

चल अंधारलेल्या वाटे , पेटऊ काजव्यातील दिवे
अस्तित्वाच्या लढाईमध्ये , निर्माण करू स्व सावलीचे चित्रे
तुला घाबरवतील ते , भूतकाळातील भुते
तुला छेड्तील ते , पिसाटलेले वारे
तू हो पाऊसाचे धारे , संपून टाक सारे भूतकालीन निखारे ...
चल अंधारलेल्या वाटे...

चल सागराच्या लाटे , उसळूया हर एक किनारे
तुफानी सागराच्या लाटेमध्ये , भेदुया हर एक अडथळे
तुला खेचतील ते , अपयशाचे लाट
तुला लोटतील ते , यशाची साथ
तू हो पाऊसाचे धारे , भिजुनी टाक तुझ्या लक्ष्याचे कळसे...
चल सागराच्या लाटे...

- सचिन तळे ( 29/06/2011 )

Tuesday, 28 June 2011

भर दुपारची वेळ होती ...

भर दुपारची वेळ होती ...

ती आणि मी , भटकलेल्या वाटेवरती...
हाथा मध्ये हाथ होता , आन तळपत्या सूर्याची किरणे ती ..
अचानक , गार गार वारा , तिच्या केसातून मला भुलवत होता ...
मी तिच्या नजराणा नजर भिडवत होतो ..
त्यातच , पाऊसाने आपली हजेरी लावली ..
आश्रयला , काहीच न्हवते आमच्या भोवती ...
मी हि भिजलो , आन ती हि चिंब चिंब भिजलीच होती
भर दुपारची ती आशी वेळ होती ...

हवा , गार हि हवा , का वाटतेसी नवा
दरवळे नवा नवा , सुगंध हे प्रीतीचे नभा
त्यात सरीचे येणे , तुला हळूच भिजवणे
त्यात तुला भिजताना पाहून , माझे मन हे भिजणे
हवा , गार हि हवा...

थेंब थेंब, पाउसाचे , आले तुझ्या ओटावर्ती
आन क्षणभर माझ्या मनी , ते थेंब, होण्यास वाटले
मनात वाटले आसे , मी असावे पाउसावाणी
माझ्या पाउसाच्या प्रेमळ धारेत , तुला हि भिजवावे
थेंब थेंब, पाउसाचे...

अंग अंग तू भिजलेली , भिजले होते डोळे हि माझे
पाउसाच्या सरी मध्ये , फिरकी घेतली , तू नाचणाऱ्या मयुरावानी
तुझा फुललेला पिसारा पाहून , मला हि इंद्रधनू व्हावे वाटले
या पाउसाच्या सरीत , तुझ्या संग फिरकावे वाटले
अंग अंग तू भिजलेली...

Monday, 27 June 2011

ऐका चिमण्याची गोष्ट...


चिव चिव करत आकाशी , उडे एक स्वछंदी
मनातच आस फक्त सुंदरश्या घरट्याची
घन घन दाटलेल्या आश्या ऐका जंगलात
दिसे त्याला सुंदरस भव्य वटवृक्ष्य फुलात
फांद्यावर त्याने बांधिले एक झोपड
आशी आहे हि ऐका चिमण्याची गोष्ट ...

ऐक दिवस अचानक त्याची ऐका सुंदरश्या चिमणीशी ओळख होते
ओळखीच रुपांतर हळू हळू घट्ट आश्या मैत्रीत होते
चिमण्याच्या त्या घरट्यातच , चिमणीच घरपण वसते
दोघांची हि मने एकमेकांत इतके गुंततात , कि
सकाळ असो व संध्याकाळ , फक्त दोघांचाच चिव चिवाट...

नजरेला पडली भुरळ , पाहिली आशी एक हिरवळ
हिरव्या गार आश्या वनात , सखी तुझी माझी चळवळ
घरात आले घरपण , चांदणे पेटले आकाशात
मनाची मणे मोहरली प्राजक्ताच्या फुलात
आशी आहे हि ऐका चिमण्याची गोष्ट ...

रोज रोज संगतीने आकाशी झेप घेयाचे , संगतीने रमायचे
तिच्या विना तो , अन त्याच्या विना ती , दोघांना हि नसे करमायचे
हळू हळू मैत्रीच रुपांतर प्रेमात , हे चिमण्याला कळून चुकले
विचारले असता चिमणीस , होकार चीमण्यास मिळाले
दोघेही हर्षाने , नाचत गात होते या जंगलात
सकाळ आसो व संध्याकाळ , फक्त दोघांचाच चिव चिवाट ...

चहू किनारे उधळून गेले , आंदाचे नवे शहारे
करमत नसे दोघांना , दोघांच्या डोळ्याविना
असेच घडले दोघात रे , उमले फुले प्रेमाचे
प्रेमाच्या सप्तरंगाच्या धनुष्याने रंगून गेले जंगल हे सारे
आशी आहे हि ऐका चिमण्याची गोष्ट रे ...

ऐका दिवशी शंका भरून आली , चिमणीच्या मनात
" सोडून जाणार नाही न मला " विचारले चीमण्यास
क्षणाचा हि विचार न करता त्याने दिले आसे उत्तर
कि , थरारले जंगल सारे क्षणभर...
ऐक पंख छाटले स्वताहून आसे , तसेच ठेवले तिच्या सामोरे
आता " सांग सखे कसा जाणार तुला सोडून मी रे " ...
विचारले असता चीमण्याने चिमणीस , ओले झाले पापण्यातील अत्तर ते सारे
परत दोघे एकमेकांत इतके फुलतात , कि ,
सकाळ आसो वा संध्याकाळ , फक्त दोघांचाह चिव चिवाट ...

प्रेमात लागली नजर , क्षणात उठला शंकेचा कहर
विश्वासा वर उभ्या असणाऱ्या भिंतीना , तडे गेले हातभर
प्रश्नाला मिळाले आसे उत्तर , चिमण्याच्या पंखाची कत्तल
काळजात धाक लागली , डोळ्यात भरले थेंबाचे पूर
आशी आहे हि ऐका चिमण्याच्या गोष्टीचा सूर

अचानक ढग गडगडते , नभात विजांचा कलोळ होतो
जिथे तिथे सारे पाणीच पाणी होते .. वादळ वारे आसे सुटते
जंगलातील सर्व प्राणी आपले जीव वाचवण्यास पळत होते
चीमण्यास उडता येईना , चिमणीस काहीच कळेना
हळूच ऐक चिमणा आला तिथे , चिमणीस नेले संगतीने
एकटा, उदास , चिमणा पडला त्या क्षणाला
आता सकाळ आसो वा संध्याकाळ फक्त एकच शुकशुकाट ...

गड गड, गड गड करी , नभावरी , त्या विजांच्या तारी
पाउसा चे हि पाणी आले , आले आसे धनुष बणावानी
मुठीत होते जीव , नजरेत तांडव पाउसाचे
पक्ष्याच्या जाती असून हि , झेप नाही आकाशी
क्षणात एकटेपण भिडले त्याच्या उराशी रे
आशी आहे हि ऐका चिमण्याची गोष्ट रे

वादळ थांबल्यावर चिमणी व तो चिमणा फिरत होते आकाशातून
नजर पडली चिमणीची त्य क्षणाला वटवृक्ष्य वरून
पाहिले आसे तिने काही , कोरिले होते चीमण्याने चिमणीस त्यावेळी
" फक्त तू मला एकदा बोली आस्ति, मी तुझ्या विना नाही राहू शकत
तर या वादळाला हि लढा देत मी जगलो आसतो "
डोळ्यात तिच्या होते आश्रूचे धारे , सगळे पुसले गेले विश्वासाचे शहारे
चुकले माझे सारे म्हणत केले डोळे कायमचे बंद तिने ,
आता सकाळ असो वा संध्याकाळ फक्त एकच शुकशुकाट दिसे...

शांत, शांत भीती ,पसरली होती, त्या जंगलाच्या आकाशी
आली फांदी पाशी , जिथे होते चिमण्याचे विश्व नगरी
हाक दिली आस्ति ,तर आस्ते जीवन दोघांचे
प्रेम च्या इतिहासात , बलिदान हे दोघांचे
नको आसे प्रेम , ज्याच्या एका , चाकाची बाजू पडती
आसू दे घाळ मेळ , तिथे जीवात जीव घुटमळती
आशी आहे हि एका चिमण्याची गोष्ट न्यारी
 
सचिन तळे 27/06/2011

Saturday, 25 June 2011

माझ्या मना...


माझ्या मना

घाव घातले मी हजार , माझ्या उरी
ठणकावून सांगितले मी , माझ्या मनी
आले अनेक वादळे , जरी माझ्या मार्गी
तरी हटणार नाही पाऊल मागे , माझे संकटावेळी

येऊ दे कितीही लाटा मना , तुझ्या अंतरी
हालचाल तर होणारच हर एका क्षणी
भय न मृतूची , न भय असत्याची
भय फक्त आहे पाटीवर वार करणाऱ्या मित्राची

पाउला पाउलात मिळतील तुला अनेक काटेरी वस्ती
चांडाळ चौकट हि नाचतील तुझ्या अवती भवती
जिभेवरची चटक नको होऊ देऊ नशेली
जीवघेणी खेळ घडतील , नाहीतर माझ्या जीवनी

अपयशाचे कळस जरी उभारले मी माझ्या मंदिरी
तरी ह्याच्या पायऱ्या व भिंती बांधिले मी यशानी
सत्याचे हत्यार जरी असले माझ्या भुवनी
तरी देवा गर्व ला घर न मिळो , माझ्या मनी

हे मना फक्त एवढंच कर , समजुतीची भर घागर
असत्यावर सत्याची पताका फडकवण्यास हो तयार
कारण मना , माझ्या कृतीची चडन घडण आहे तुझ्यावर
हे मना चल गाटू शितीजा पलीकडचे अंतर
हे मना चल गाटू शितीजा पलीकडचे अंतर

- सचिन तळे ( 21/06/2011 )

चाललेल्या वाटेवरती...


चाललेल्या वाटेवरती तुझ्या आठवणीच रोपट दिसले
त्या रोपट्याच्या पतिवरती तुझ्या नावाचे दवबिंदू हसले
स्पर्श करता दवबिंदुस मी , क्षणात ते नाहीसे जाहले
अन , डोळ्यातील दवबिंदुस , निघण्याचे कारण मिळाले

चाललेल्या वाटेवरती तुझ्या आठवणीचे जलतरंग दिसले
त्या जलाच्या किनार्या वरती तुझ्या नावाचे अक्षर भेटले
भेटतास तुझ्या अक्षरास मी , क्षणात ते विरघळून गेले
अन , मनातील सागरास , वादळाचे कारण मिळाले

चाललेल्या वाटेवरती तुझ्या आठवणीचे पाखरू भिरकले
त्य पाखराच्या आवती भवती तुझ्या आसण्याच भास झाले
अनुभवता हा भास मी , क्षणात ते विसरून गेले
अन , स्पंदनातील पाखरास , उडण्याचे कारण मिळाले

चाललेल्या वाटेवरती तुझ्या आठवणीचे फुल फुलले
त्य फुलाच्ये पाकळ्यांवर तुझ्या हर्षाचे रंग दिसले
रंगतास त्या रंगात मी , रंग सारे उडून गेले
अन , मनाच्या मनफुलास , रुसण्याचे कारण मिळाले

- सचिन तळे ( 25/06/2011 )

Friday, 24 June 2011

माझ्या हातून एक गुन्हा घडणार होता...


श्रुंगार साजरा होता , गार गार वारा होता
माझ्या हातून एक गुन्हा घडणार होता...
ती समोर होती , तिच्या गालात कळी होती
कळ्यानमधल्या ओटपाकळीवर रसाचा गुलकंद होता
गुलकंद पाहता , मनी माझ्या अंगार होता
माझ्या हातून एक गुन्हा घडणार होता...

तिच्या डोळ्यात काजळाची लाट होती
पापण्यामध्ये मधुचंद्राची आस होती
मधुचंद्राच्या भोवऱ्यात माझी नाव डुबणार होती
माझ्या हातून एक गुन्हा घडणार होता...

ती मदनाची देवि बनून माझ्या समोर उभी होती
स्वर्गातल्या देवांना हि भूल पडणारी ती अप्सरा होती
तिच्या ग्रहणात माझी आमावस होती
माझ्या हातून एक गुन्हा घडणार होता...

आवरल तिनी स्वताला , अन मी माझ्या मनाला
तिच्या शालू मध्ये गुंतवल मी माझ्या शब्दांना
बोलके झाले दोघांचे हि ओट , नाहीतर
दोघांच्या हि हातून एक गुन्हा घडणार होता...
दोघांच्या हि हातून एक गुन्हा घडणार होता...

 सचिन तळे ( 23/06/2011 )

Thursday, 23 June 2011

बघता बघता दिवस संपला...बघता बघता दिवस संपला , सूर्याला हि चंद्र भेटला
घरट्यात वाट बघत बसणाऱ्या पिलांना त्यांचा आधार दिसला
बघता बघता दिवस संपला...

लाल निळ्या ढगांमध्ये , पाखरांच्या दिशा निसटल्या
दारावरच्या नजराणा , धनी येण्याची खून पटल्या
बघता बघता दिवस संपला...

थकलेल्या या हाताना , विश्रांतीची चाहूल मिळाले
गार गार वाऱ्यामधुनी , घरी परतण्याचे आदेश मिळाले
बघता बघता दिवस संपले ...

वाटेवरती चालताना , स्वप्नातले इंद्रधनू सजले
सजलेल्या स्वप्नामध्ये , संसाराची रुजलेली चाके दिसले
बघता बघता दिवस संपले ...

कष्टाळलेल्या डोळ्यांना जेह्वा , सजणी चे रूप दिसले
पाटीवरती खेळवता मुलांना , बाबा चे हि रुद्य रडले
बघता बघता दिवस संपले ...

चुलीवरची भाकरी , राणीच्या हाती खावे
आन कोरलेल्या त्या चंद्राला पहात , झोपेत स्वप्नाची मैफिल बसावे
बघता बघता दिवस संपले ...

पहाट येते कधी हे मलाच नाही कळले , आसाच कष्टाने झिजणे माझे
आता राहिले फक्त एकच सांगणे , बघता बघता माझ्ये दिवस संपले ...
बघता बघता माझ्ये दिवस संपले ...

- सचिन तळे ( 21/06/2011 )

सकाळ २३/०६/२०११ ....

Wednesday, 22 June 2011

माझे गाव ...

अल्याड डोंगर , पल्याड मैदान ,
गाव माझं आहे लहान , तरी आहे सोन्याची खान
धुक्याच्या पांघरत झोपे गाव सारी
सकाळ च्या पारी येती वासुदेव दारी
सुर्यनारायण उटवी किरणे फेकून मुखी
हळूच उटी सार , पाखरांच्या भेटी
गाव माझं लहान, तरी आहे सोन्यावाणी ...

नदीच्या काटीवर धुनी आणि भांडी
लहान लहान मुलांची चालती मस्ती
गुऱ्या ढोर्यांची न्याहारी लय भारी
शेतावर निघती सारी काम करी
गाव माझं लहान, तरी आहे सोन्यावाणी ...

स्वप्नात रंगली कणसाची दाने
बुजगावणे उडवी पाखरांची थवे
मातीच्या ढोकळ्याला फोडी , बैल राजाची गाडी
भाकरी व कांद्याची जोडी मुखात लय ठस्ती
गाव माझं लहान, तरी आहे सोन्यावाणी ...

डोंगर्याच्या आड लपंडाव चाले सूर्य व चंद्राची
मधूनच सप्तरंगाची आकाशी सजे साडी
पाखरांना हि नाही घर दूर सांज
झाडा मागे लपून गोष्ट ऐक्ये , चंद्र चांदण्याची जोडी
गाव माझं लहान, तरी आहे सोन्यावाणी ...

अल्याड डोंगर , पल्याड मैदान
गाव माझं लहान, तरी आहे सोन्यावाणी ...

Tuesday, 21 June 2011

माझ्ये शब्द

भेदिले भूमंडलास मी , माझ्या शब्दांच्या तीराने
छेदिले आकाशाश मी , शब्दांच्या अंकुराने

नभात हि गर्जना केली मी , माझ्या शब्दांच्या संघर्षाने
चमकतील ती चांदणीरात्रशब्दांमधल्या चंद्राने 

वार्यावरती हि वादळे निर्मिले मी , माझ्या शब्दांच्या झोक्याने 
वादळालाही पांघरण घाले , शब्दांच्या चादरीने 

सागरात हि तुफान ओतिले मी , माझ्या शब्दांच्या स्फ्रुतीने 
तुफानात हि लाटा हसतील , शब्दांच्या हसव्याने

पेटवले ते रान सारे मी , माझ्या शब्दांच्या आगीने 
वणव्यात हि हिरवळ पसरे , शब्दांच्या दवबिंदूने  

वितवळले  ते हिम सारे मी , माझ्या शब्दांच्या उष्णतेने 
तळपत्या पाण्याला हि गोटवे , शब्दांच्या थंडीने

- सचिन तळे ( 21/06/2011 )

Monday, 20 June 2011

मी एकच प्याला पिला ...

मी एकच प्याला पिला ,
आहो ,  मी एकच प्याला पिला
नशेच्या दरबारी अवतरला ,  हा  मदनाचा टिळा
मी एकच प्याला पिला ...

स्वर्गातील हे अप्सरा , आले छम छम करत सिधा
ओटावरच्या रसाची तिने , पाजला मला प्याला
मी एकच प्याला पिला ...

तिच्या नजरेच्या तीराने , तिने मारला तीर असा
काळजाच्या अंतरातअसा पाझरला हो प्याला
मी एकच प्याला पिला ...

तिच्या घागऱ्या मध्ये , लागला हो आमचा जिव्हाळा
भरली आग मनात , तिने भरला तारुण्याचा प्याला
मी एकच प्याला पिला ...

मनाच्या अंतरी अवतरली , दारूची शाळा
शाळेत दिला बाईनी , अभ्यासाचा हा प्याला
मी एकच प्याला पिला ...

चंदेरी चांदण्यात सजवली , तुझ्या रूपाचा टिळा
चंद्राला हि आली लाज , असा भरला मदनाचा प्याला
मी एकच प्याला पिला ...


- सचिन तळे ( 20/06/2011 )

Sunday, 19 June 2011

सांग तुझ्या शब्दांमध्ये ....

सांग तुझ्या शब्दांमध्ये आज का रडू  फुटले  
प्राजक्ताची फुले हि आज , का तुटून पडले
कोणते घाव तू घेतले , कि आज शब्द हि रडले
तळपत्या सूर्याला हि आज ग्रहण का लागले ...
सांग तुझ्या शब्दांमध्ये ....

सांग तुझ्या शब्दांमध्ये , आज का काटे फुटले
गुलाबाच्या पाकळानचे रंग , आज का उडाले 
कोणते काटे तुला रुतले , कि आज श्ब्दांमधुनी रक्त सांडले 
सळसळत्या रक्ताला हि ग्रहण आज का लागले
सांग तुझ्या शब्दांमध्ये ....

सांग तुझ्या शब्दांमध्ये , आज का वणवा लागले
मोहरलेल्या रातराणीच्या वनात , आज आग का भडकले
कोणते दुख तुला जाणवले , कि आज शब्दांमधून आग फेकले
हिरवळलेल्या वनाला हि ग्रहण आज का लागले
सांग तुझ्या शब्दांमध्ये ....

सांग तुझ्या शब्दांमध्ये , आज का कोरड पडले
रुणझुणत्या गंगेच्या प्रवाहात , आज अडथळे का लागले
कोणत्या सूर्याचे तेज तुला भासले , कि आज शब्दांमधून वाळवंट दिसले
प्राणाच्या जलस्वामिनी ला हि ग्रहण आज का लागले
सांग तुझ्या शब्दांमध्ये ....

- सचिन तळे ( 18/06/2011 )