माझे फोटो

Wednesday 23 November 2011

नका हिणवू मला व्येश्या म्हणुनी

नका हिणवू मला व्येश्या म्हणुनी

मी अबला नारी , कोणाच्यातरी घरची
कसे वासनाच्या दारी , हा देह सांडला मी
काळजावर ठोकून शिळा , हा बाजार मांडला मी

जन्म हि माझा तसाच , जसे जन्मले तुमच्या मुली
डोळ्यात माझ्या हि तेच स्वप्ने , जे पाहता तुम्ही
स्री आभूषण कधीच पेटवले , पेटलेल्या अंगाने
पुसून सारी स्वप्नावली , हा बाजार मांडला मी

दूर राहिले घर दार , दूर सारी नाती गोती
कोणाच्या तरी पोटाची खळगी , भासते रोज मनी
म्हणुनी ह्या देहाची , सजवली रांगोळी , अंगणी
घेऊन हजार घाव , हा बाजार मांडला मी

लोटता मला आज , दूर या समाजातून
व्यथा समजणार कसे , नाही डोळ्यात तुमच्या तो पूर
मी व्येश्या म्हणुनी न्हवती जन्मली , पण मरतेय व्येश्या म्हणुनी
कधी विचारून पहा मनी , का बाजार मांडला मी

तीरसकाराच्या नजरांनी पाहता , म्हणता मला बाजारी
हस्ते तेव्हा , पाहून देवाला , वसवलेल्या अंतरी
नश्वर या देहाचा आज बाजार मांडला मी
कधी चालून बघा ह्या वाटा , किती काटे टोचल्या रुद्यी
का ? बाजार मांडला मी ....



- सचिन तळे

Monday 14 November 2011

आता राम राम सांगा

आले चार खांदे , आता राम राम सांगा
आठवणीच्या फांदीने , हे शरीर माझे जाळा

जन्मा पासून मृतूचा , प्रवास मी गाठला
कधी हसत कधी रडत , वैकुण्ठ सापडला
नका नका डोळ्यातून ह्या आश्रुच्या धारा
मलाच दुख होतंय सोडून तुम्हास जाताना

नव्हते काही येताना , जाताना हि काही नाही
माझ माझ म्हणार, अस्तित्व पुसलं एका क्षणामधी

आता हिशोब लागणार माझे , पाप आणि पुण्याचा
मिळेल कदाचित मला , पुन्हा माती मानवी जन्मचा
मी म्हणेल तेव्हा , देवा नको हा मानवी धर्म
कलयुगात सर्वांच्या , घरी वसतो हा गर्व

एकच सांगणे सर्वाना , कोणी नाही कोणाचा
आल्या जन्मी द्यावा आनंद , चहूदिशांनी चैतन्याचा
स्वर्ग व नर्काच्या , उंबरठ्यावर मी उभा
आठवणीच्या फांदीने , हे शरीर माझे जाळा
आता राम राम सांगा....

 - सचिन तळे 15/11/2011

Tuesday 8 November 2011

हा किनारा

हा किनारा सागराचा , वाळूकनाचा, स्वप्नांचा

अलगत स्पर्श करणाऱ्या , माझ्या कवीमनाचा
सागरी लाटांचा , शंख शिंपल्यांचा , मोतींचा
नकळत उमटणार्या ,या माझ्या शब्दांचा ...

हा किनारा माझ्या बालपणीचा , तारुण्याचा
हळुवारपणे खेळणाऱ्या माझ्या मित्रांचा
मस्तीचा ,उनाड्केचा , भिर भिरनाऱ्या पाखरांचा
टपोऱ्या रंगाचा, या माझ्या बालमनाचा ...

हा किनारा माझ्या साजनीच्या , आठवणीचा
नकळत फुलणाऱ्या तिझ्या माझ्या प्रेमाचा
बोलीचा , स्वप्नांचा , रुसणाऱ्या क्षणांचा
वेगळ्या अनुभवाचा ,या माझ्या प्रीयसीचा ...

हा किनारा माझ्या एकांताच्या रस्त्याचा
अडखळत पडणार्या माझ्या पाऊला पाऊलांचा
शांततेचा , झाडावरूनी गळणाऱ्या पाना फुलांचा
थकलेल्या हातांचा , या माझ्या उत्तरायनचा ...

हा किनारा असाच आहे , जसा होता
फक्त बदला हा माणसाचा चेहरा
त्याच लाटा , तीच भरती , अन तीच आहोटी
उरल्या त्या फक्त आठवणीच्या गोष्टी

- सचिन तळे