माझे फोटो

Sunday 28 August 2011

श्रावण...


पाउसाच्या मोहक थेंबात , श्रावण हे सजले

भिजुनी अंग अंग , ओले चिंब , मन हे भिजले

पहिल्याच श्रावणाचा , गंध हा दरवळला
पहिल्याच सरीचा , ओला हा शब्द माझा
पहिल्याच पाऊसाचे, धरणी माय बोले
पाउसाच्या मोहकतेत , श्रावणाचे अबोल गाणे

कुठून आले गर्जणारे , मेघ हे ओले
कुठून फिरल्या श्रावणातले गार गार वारे
कुठून पडली हिरवी पान नक्षत्राची चांदणी
कोणी केली या पाउसाच्या थेंबात, मोहकशी करणी

नव्याने हर्ष हा , भुवनी दाटला
नव्याने मोरपंख, नभी इंद्रधनू फुलला
नव्याने धुक्याची , चादर हि रंगली
नव्याने गारटण्याची , चाहूल हि लागली

आताचं कुठे या मातीला कस्तुरी रंग चडला
आताचं कुठे नव्या पर्वाचा अंकुर हा भिजला
आताचं कुठे घेतला वसा ह्या श्रावणाचा
आताचं कुठे या पाऊसात , कवीचा शब्द उमटला

-सचिन तळे   29/8/2011



Friday 26 August 2011

काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं


काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं
मन थोडेसे हसले , अन फसलो म्हणाल , का?
ते कळलंच नाही , फक्त फसलो म्हणाल ...
फसलो ते तिच्या बोलण्यात , तिच्या हसण्यात
तिच्या नशेली डोळ्यात ,तिच्या रुसण्यात...
जसा कृष्ण राधेत , राम सीतेत
पण हे फसणे हि मला खूप आवडल
खरच , काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं ...

आता तू जवळ नाही , जवळ आहे ती फक्त आठवण
रचलेल्या कवितांमध्ये, फक्त तुझी साठवण
गावाच्या वाटा तर कधीच विसरलो
कळलच नाही मला ,प्रेमाच्या वाटेवर मी कधी घसरलो
सोबत नाही आता कोणी , मित्रांचा थवा हि कधीच दूर झाला
परत , मन एकांतात फसलो म्हणाल
पण हे फसणे हि मला खूप आवडल
खरच , काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं ...

रोज रोज हट्ट तूच करत होतीस
माझ्या हाताला धरून , जगाशी सवांद तूच साधत होतीस
हट्ट हि तुझाच होता ,माझे शब्द हि तूच होतीस
खोटे पडले शब्द सारे , खोटे झाले तुझे हसणारे ओट हे
तुझा माझा स्पर्श हि खोटा , अन
माझ्या तुझ्या प्रेमात लुक लुकणारे तारे हि खोटेच ठरले
मन थोडेसे हसले , अन फसलो म्हणाले
पण हे फसणे हि मला खूप आवडल
खरच , काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं ...


सचिन तळे   26/08/2011

Monday 22 August 2011

रंग श्रावणाचा .....


सावळे रंग रंग , कृष्णा सवे श्रावणी दंग दंग
हिरव्या गार वनात , श्रावणाचा हा छंद

धुक्याच्या अंत अंत , पहाट जागली शांत शांत
नादस्वर घुमतो क्षणांत , श्रावणाच्या मंदिरात

उंच उंच डोंगरआड , झरा वाहतो अंगणात
आतुर मिलनास , श्रावणाच्या सागरास

कुहू कुहू कोकीळबोले, नभात पारव्याचे गाणे
नाचते मयूर सारे , श्रावणातल्या ओल्या चिंब सरीने

मातीत गंध गंध , दरवळे चंदनात कस्तुरी मंद
मोहक वाटते सुवास , श्रावणातल्या या विश्वात


- सचिन तळे 22/08/2011


Tuesday 16 August 2011

ह्या श्रावणी ...सांगा कोणी



हा श्रावण , मनी भावण , ह्या क्षणी
सांगा कोणी , शिंपडले पाउसाच्या सरी .. ह्या श्रावणी

ह्या श्रावणी, नभात उमटली कशी , रंगाची छबी
सांगा कोणी , आणिले इंद्राची नगरी...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , मोतियाचे दाणे , सांडले गवताच्या पातीवरुनी
सांगा कोणी , पाहिले दवबिंदूचे ते नाणी ... ह्या श्रावणी

ह्या श्रावणी, चिंब चिंब भिजुनी , सजली गोकुळ्यातली गवळणी
सांगा कोणी , अडवल्या कृष्णाच्या घागरी ...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , नार चालली , नदीच्या तीरी
सांगा कोणी , दाविली वाट राजाच्या दारी ...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , कवटाळून घेती , धुक्याच्या चादरी
सांगा कोणी , घातल्या हिरव्यागार नीरा भुवनी ...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , मयूर नाचती , सरीच्या लहरी वरी
सांगा कोणी , ऐकले कोकिळेचे गाणी ...ह्या श्रावणी

सचिन तळे  16/08/2011

Tuesday 9 August 2011

नकळत आपल्या प्रेमाचे काव्य मीच रचतोय



मी श्वास रोखून फक्त तुझी वाट पाहतोय
रोज येड्यागत तुझ्या आठवणीचे गाणे गातोय
शब्द रचता रचता संपवण्याचे प्रयत्न करतोय
नकळत आपल्या प्रेमाचे काव्य मीच रचतोय

भिजली होतीस काल तु पाउसात चिंब चिंब
हळूच पाहिले होते मी, तुला ह्या पाउसात ओले चिंब
आजून हि आठवतीय , तुझ्या माझ्यातला प्रेमविलास पाउस
पण काल चा पाउस माझ्या डोळ्यातून फक्त रडतोय
नकळत आपल्या प्रेमाचे काव्य, मीच रचतोय

सांजेस भेट हि ठरली होती तुझी माझी
त्या सांजेला तु भेटली होती मला एकटी
जाताना तुझा डोळ्यात होती अश्रुंचे फुले
माझ्या हृद्यात निवडुंग तूच पेरून गेली होती
ह्या निवडुंगाला पाणी माझ्या आश्रुनी वाहतोय
नकळत आपल्या प्रेमाचे काव्य, मीच रचतोय

कळत नसेल तुला किती त्रास मला होतोय
माझ्या शब्दांना, माझ्या काव्यांना, माझ्या विचारांना
मी तुझ्या आठवणीतच का बुडवतोय ?
तु आली अन गेली अलगत वाऱ्याच्या झोक्यावानी
ह्या वाऱ्याच्या झोक्याना, मी का रोखतोय
खरच आपल्या प्रेमाचे काव्य, मीच का रचतोय



Monday 8 August 2011

राजसा येऊ कशी मी आज ...


सांगू कशी , येऊ कशी
अडवते हि लाज ,मला फसवते हि रात
राजसा येऊ कशी मी आज ...

येता येता वाटेवर चंद्र भेटला
विचारता मला गालात हसला
सांगेल घरी जाऊन माझ्या आईला
भीती वाटी मनाला , म्हणून गेले घरला
राजसा येऊ कशी मी आज ...हळूच सांगना

पाटला करतोय कोणी तरी , सावलीच्या आड
सोडत नाही साथ माझी , अडवतोय पायवाट
रातराणीला उठ्वितोय , काजव्यातील आग
राजसा येऊ कशी मी आज ...

पदर घेतले डोक्यावरी , ओळखू नये कोणी तरी
श्वास हळू हळू घेत ,चालली पायाची चालतीरी
एवढ्यात कोणी तरी, दिली मागण मला हाक
तो तर होता फक्त तुझा माझा भास
राजसा येऊ कशी मी आज ...

निजलेल्या डोळ्यांना , तुझ्या आठवणीने भिजवल्या
भेट घडेल कशी , रात्र नाही हि निजली
एकटक पाहते मी तुझी वाट
राजसा येऊ कशी मी आज ...
अडवते हि लाज ,मला फसवते हि रात
राजसा येऊ कशी मी आज ...




Friday 5 August 2011

मधुचंद्राची रात्र.....


लाजल्या लाजाळूच्या पाकळ्या
पाकळ्यात निजले रातराणीच्या कळ्या
कळ्या कळ्या मध्ये सजले , मधुचंद्राची रात
रात्रीला चंद्र देतो , हळूच मदनाला साथ
हि रात्र गुलाबी पाकळ्या अन कळ्याची
हि रात्र तुझी माझी , नव्या फुलाची

कीर कीर करणारे तारे , हळूच करती आवाज
आवाज तुझ्या माझ्या हृदयाची , ऐकते हि सांज
सांज लपली तुझ्या डोळ्याच्या , काजळात
या काजळात घडेल तुझा नि माझा संवाद
हा संवाद नशेली , रात्रीच्या अंधारात
हा संवाद तुझा माझा , नव्या स्वप्नात

एकटीच तू अन एकटाच मी
तुझ्या सहवासात क्षणभर , जगा फितूर मी
ओटाना स्पर्श होता , गीतांना येती जाग
तुझ्या माझ्या मिलनात , हृदयात वाजती तार
हे मिलन मदनाचे , उघडे द्वार
हे मिलन तुझे नि माझे , नव्या स्वर्गात

एकरूप जीव झाले , क्षण वितळले क्षणात
नजरांचा खेळ संपला , घेतला असा श्वास
सावल्यांना हि कळले नाही , कोण आहे कोणाचा धनी
अंतरात गुरफटून गेली , नव्याने उमलणारी पात
हे क्षण स्मरणात , आठवणीच्या गावात
हे क्षण तुझे न माझे , पाहे नवा प्रकाश


सचिन तळे 04/08/2011

Thursday 4 August 2011

जन्मलो मी मराठी ...


हि भूमी, माय भूमी ,मराठी माझी
मी धन्य धन्य जाहलो , जन्मलो मराठी ...

स्वर्गा परी मिळाली मम , तांबड्या छातीची जननी
आजन्म राहील तुझ्याच चरणी , हि शपथ ओटी
सह्याद्रीच्या कड्या कड्यावर , शिवबाची होती भेटी
मस्तकी भगवा टिळा लाउनी , जन्मलो मी मराठी ...

संत कृष्णा , संत गोदा , संत वाहते यमुना
सळ सळत्या रक्तात , मावळ्यांच्या चालल्या फौजा
महाराष्ट्र धर्म हेच कर्म, माझ्या जीवनी
गर्व मजला या महराष्ट्राचा , जगतोय मी मराठी ...

इतिहास घडवले , साता समुन्द्रपार, फडकवले झेंडे
इतुके खेळ खेळले , मराठांच्या निधड्या छातीच्या जाती
सिंहाच्या गर्जनेत , दिल्लीवर झाली स्वारी
या महाराष्ट्राच्या अभिमानास्पद , लढतोय मी मराठी ...

ह्या इंद्र्नभाच्या छटा तोडूनी , पांघरले या भूमीवरी
संतांच्या अभंगवाणीत , झुळ झुळते नद्यांच्या लहरी
कुबेराचेही धन साचते , भरते अनेक कलेचे घागरी
ह्या काळ्या मातीत रुजलोय , घडतोय मी मराठी ...

मी मराठी , या भुवनी , आव्हाने पेलतो मनगटीवरी
अंगणी उतुंग पर्वताच्या रांगा , पायदळ मैदानी सांगा
पोलादीच्या या शरीरावर घेतल्या हजार घावा
धर्म राखता राखता , स्वराज स्थापितो , हिंदवी राजा
देश रक्षणार्थ , पानिपत लढवले, ऐसा मराठी माझा
मी जन्मलो , पावलो , धन्य धन्य झाहलो , मराठी एकता

- सचिन तळे