काळात राजकारंची व्याख्याच सगळ्यांनी बदलून टाकली आहे ." राजनीती " , " राज का रान " ,
" राज कारण " ई . आणि आश्या अनेक चित्रपटात राजकारण म्हणजे दबंग शाई किवा गुंडगिरी
हेच चित्र उमटवल . म्हणून कोणता हि पालक आपल्या पाल्याला राजकारणी हो व देश चालव अस
म्हणत नाही . मंग आपल्या सारखी निस्वार्थी मनाचे तरुण जेव्हा राजकारणात उतरत नाही तेव्हा हे चुकार मनाचे लोक राजकारणात उतरतात आणि आपल्याच अधिकारांवर गदा आणतात , आपण फक्त चार चौघात ह्यांना शिव्यादेण्याच्या पलीकडे काहीच करत नाही .निवडणूक आली कि त्यांनी केलेल्या घोटाळे वर पांघरण घालून त्याला मतदान करतो व साहेब म्हणत त्याच्याच पाटीशी फिरतो .
गेल्या काही महिन्यामध्ये , वारजे माळवाडी इथे एका राजकीय पक्षाची सभा व मेळावा होता . या सभेत केंद्रीय मंत्री व आजी माजी सर्व मंत्र्यांची उपस्ती लागणार होती . साहेब येणार म्हणून त्यांच्या
कार्यकरत्यांनी सभेच्या दोन तीन दिवसा आगोदरच वारजे माळवाडी च्या आस पास शुभेच्या च्या
होर्डिंग झळकावले . हे होर्डिंग पाहता मनात विचार आला नक्की येतंय तरी कोण . " या देशाचा व
लोकशाईचा सेवेकरी का राज्यशाईचा हिटलर " . मला हि उस्तुकता लागली . सभेत स्थानिक लोकांच्ये
प्रश्न सुटतील हाच विचार घेऊन मी सभेला गेलो . केंद्रीय मंत्री येणार म्हणून पदाधिकारी नि गावा
गावा तून बस भरून लोक आणली होती , त्यामुळे स्थानिक लोकांना बसण्यास जागा मिळाली नव्ह्ती. मी हि शेवटच्या टोकाला उभे असलेल्या लोकांमध्ये सामील झालो . जेणे करून मला ह्याचं मत जनता येईल . अव्वा ते सव्वा आसे शब्द फेकत काही पदाधीकारणी आपली भाषणे केली , मंग आजी माजी मंत्र्यांनी ,बघता बघता सभा संपली . सुरुवात पासून ते शेवट पर्यंत फक्त पक्ष्यावर भाष्य झाल , स्थनिक लोकंचे प्रश्न सोडवणार एक भाष्य झाल नाही . डोक्यावर हात मारलं आन निघालो . सर्व काही घडल्या नंतर बोल्याण्याची प्रथा आहे आपल्या इथे . चालता चालता लोकांची कुजबुज ऐकत गेलो , कोण म्हणाल " आमुक आमुक हा गुंड आहे " कोण म्हणे " तो तसाच आहे " तर कोणी " आरे सगळे चोर आहेत रे " , " सगळे राजकारणी एकच काहीच फायदा नाही " . हे सर्व काही मी ऐकत होतो . मनी वाटल ह्या नेत्यांना शिव्या देऊन काय फायदा , ह्या सर्वांचे जिम्मेदार आपण हि कुठे तरी आहोत . आपण त्यांना या जागेवर बसवतो . नक्की लाचार कोण राजा कि सेवेकरी . लोकशाई राजा असून सेवेकरी राजे झाले . देशाच्या प्रगतीला हातभार लागणाऱ्या संपत्तीची लुट केली , तरी आपण गप्प . मंग हे राजकारणी लोक मनात नक्की म्हणत असतील .
आम्ही राजकारणी , आमची आहे वेगळी करणी ,आम्ही राजकारणी..
ब्रहष्टाचार , आमच्या मनाचा आकार हा
उरात आमच्या चुकार पणा
घडला असा संस्कार म्हणा
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..
घोटाळे आमच्या रक्तात उसळे
लबाडी ची रोज आम्ही कब्बडी खेळे
अंधाऱ्या रात्री चोरटेपणा
हाच आहे आमचा वेगळेपणा
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..
मनात आमच्या रोजच चांदणे
डोक्यावर असतात हजार लफडे
विश्वाष घात हा आमचा पात
जनतेला हवा फक्त आमचा हाथ
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..
तरुणाई ला लढवायच , धर्मावरती भडकवायचं
किसा आमचा कसे भरतील , हेच आमच्या डोक्यात शिजतील
देवाला हि मागे सारती , इतके लाचार हि जनता सारी
आम्हला हे ठाऊक आहे म्हणून , लोकशाईत आमचीच चालती
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी , आम्ही राजकारणी ..
- सचिन तळे ( 30/06/2011 )