माझे फोटो

Monday 30 May 2011

माझा आभाळ र



माझा आभाळ , आभाळ त्याला  चार भिंतीच आधार  
माझ्या संसारातल्या भांडीचआवाज असा खणकर  
धरणीच्या उरावर , धनी माझा काम करी
भाकरीच्या चटणीला , लसणाची आवड भारी
माझा आभाळ ...

गोडवा त्याच्या मुखात , ठेवतो मला सुखात
काटा रुजते त्याच्या पायात , रक्त सांडते माझ्या मनात
काळजी वाटे क्षणात  , ज्हेवा धनी जातो दूर  
त्याच्या परतीचा इशारा , पाखरे दावती नवा  किनारा  
 माझा आभाळ ...

लेकरावणी सांभाळ , देवा एवढी काळजी घे  
भीती  वाटते डोळ्यात , धनी आसतो ज्हेवा शेतात 
घाव करती सावकार , रानात नाही पाणी
वर्षाव तुझा होऊ दे , संसार माझा टिकु  दे
 माझा आभाळ ...

लाट संध्याकाळची , शांत होती उपाशी पोटी
शिजतील कसे दाने , लेकरांच्या भुकेसाठी 
आज फितूर झाली सारी , धनी ची आस न्यारी
कारभारी तुमच्या मुळे , माझ्या संसाराला छप्पर भारी
माझा आभाळ ...

  - सचिन तळे 29/05/2011


आम्ही राजकारणी ..



ब्रहष्टाचार  , आमच्या मनाचा आकार हा 
उरात आमच्या  चुकार पणा
घडला असा  संस्कार  म्हणा
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी
आम्ही राजकारणी ..

घोटाळे आमच्या रक्तात उसळे
लबाडी ची रोज आम्ही कब्बडी  खेळे
अंधाऱ्या रात्री चोरटेपणा
हाच आहे आमचा वेगळेपणा
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी
आम्ही राजकारणी ..

मनात  आमच्या रोजच चांदणे
डोक्यावर असतात हजार लफडे
विश्वाष घात हा आमचा पात
जनतेला हवा फक्त आमचा हाथ
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी
आम्ही राजकारणी ..

तरुणाई ला लढवायच  , धर्मावरती भडकवायचं 
किसा आमचा कसे  भरतील , हेच आमच्या डोक्यात शिजतील
देवाला हि मागे सारती , इतके लाचार हि जनता सारी
आम्हला हे ठाऊक आहे म्हणून , लोकशाईत   आमचीच चालती  
आहो आम्ही राजकारणी ..
आमची आहेच वेगळी करणी
आम्ही राजकारणी ...      
                                                
 - सचिन तळे ( 30/05/2011 )