माझे फोटो

Tuesday, 19 March 2013

मुंबईकरांच्या नजरेतून .. शरद पवारांची ..राष्ट्रवादी..

मी मुंबईकर ...घड्याळ्यात असणाऱ्या सेकेंद काट्यगत सतत न थांबता कार्यरत असणारा ..स्वताच्या घरात स्वताच्या अस्तित्वासाठी भांडणारा ..चार भिंतीच्या आत राहून चंदेरी दुनियाचे स्वप्न पाहत कष्टाने अन घामाच्या धारेने शांत पने झोपणारा .. पाटीवर कितीही वार झाले ते निमूट पने सहन करत देशाची आर्थिक बाजू सांभाळणारा ..साधा भोळा मुंबईकर . पण आम्हा मुंबईकरांची एक वैशिष्ट म्हणजे एकत्र येण्याची व एकमेकांना साथ देण्याची वृत्ती .म्हणून तर मुंबईत झालेले बॉम्बस्फोट असो , अतिरेकी हल्ले असो , हर एका महिन्यात होणारे छोटे मोटे राजकीय व जातीय दंगली असो ..हे सर्व पचवत कार्य करत स्वताच्या आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय घडामोडीकडे जातीने लक्ष्य देणारा मुंबईकर राजकारणात हि तेवढ्याच प्रमाणात सक्रीय असतो म्हणून मुंबईत हर घरात एक कार्यकर्ता हा बिनचूक दिसेल .


मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी म्हणून.. देशाच्या कानोकोपर्यातून लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येतात आणि इथेच वास्तव्य करतात . तिथले राजकीय मुडदे इथे पेटवून स्थानिकांना डावलत स्वताच शक्ती प्रदर्शन भरवतात . या वाढत्या परप्रांतीयामुळे वाढत चालेली गुन्हेगारी , वाढत चालेली अनधिकृत बांधकामे ,वाढत चालेली बेकारी , मुंबईत अपुर्या पडणार्या सोई सुविधा आणि ह्यांना स्वताची वोटबँक बनवून त्यांना पाटीशी घालणारी सर्व राजकीय पक्ष्या बद्दल मुंबईकरांच्या मनात सातत्याने चीडचीड हि वाढतीय.. मंग .. त्यात कॉंग्रेस सारख्या भ्रष्टाचारी पक्ष्याला हातात घड्याळाची दोरी बांधून लढणारी शरद पवारची राष्ट्रवादी हि अपवाद ठरत नाही . आजही स्वताला अल्पसंख्याक म्हणून घेणार वर्ग व परप्रांतीय वर्ग राष्ट्रवादीच्या पदावर विराजमान दिसतील उदा . नवाब मलिक ते कालचे नरेंद्र वर्मा आणि सहकार शेत्रात राष्ट्रवादीच वर्चस्व असल्याने स्वार्था पाई कार्यालयात जमणारे मुंबईतले सहकारी मंडळी बस्स ..एवढीच शरद पवार साहेब.. एवढीच तुमची राष्ट्रवादी मुंबईत कॉंग्रेस च्या भारोसावर शामियाना मांडून बसलीय ... मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मराठी अस्मिता ..ह्या विषयावर जो नेता बोलतो ..लढतो ..मुंबईकर त्यांच्याच विचारणावर व आदेशावर वाहत जातान दिसतो. म्हणून तर मा . श्री . बाळासाहेबांपासून ते राज ठाकरे यांची मनसे तुम्हाला मुंबईत नव्हे तर राज्याच्या कानोकोप्र्यात दिसेल . गल्लीतून दिल्लीत जाऊन कोणीतरी महाराष्ट्राची वाचा फोडावी ..कोणीतरी मुंबईच्या पाठ्वर्ती वाढत चालेल जन वारूळाच स्फोट दाखूवन द्याव .. कोणीतरी मुंबईच्या गल्लीतल गोंधळ दिल्लीश्वरा समोर मांडव .. कोणीतरी सह्याद्रीचा व मराठी संस्कृतीचा वारंवार होणारा अपमान थांबवावा .. कोणीतरी सळसळत रक्त घेऊन दिल्लीत महाराष्ट्राचा ध्वज उभारावा ...यासाठी मुंबईकर सार वैर विसरतो .कॉंग्रेस च्या भ्रष्टाचारी संस्कृतीत वाढलेल्या ताई ना मदत करतो .मंग शरद पवार साहेब तुम्ही जर पंतप्रधान होणार असेल तर तुमच्यावर झालेले आरोप प्रत्यारोप सार काही विसरून हा मुंबईकर तुमच्या पाठीशी उभा राहील ..पण , मुंबईकरांच्या विषयाला बोट लावणार असेल तर ...

अस हि म्हणतात कि शरद पवारांनी फक्त आणि फक्त बारामतीचा विकास केला , केला असावा जसा विलासरावांनी लातूरचा केला तसा .पण जश्या नाण्याच्या दोन बाजू नाकारता येत नाही तश्या शरद पवारच्या चांगल्या बाजूला हि नाकारत येत नाही ..कितेक उद्योग धंदे ,कितेक सहकारी कारखाने उभारली ..मान्य आहे कि शरद पवारांवर आरोप झाले मंग त्यात मुंबई महानगर पालिकेचे माजी उपाउक्त गो. रा. खैरनार चा आरोप असो कि अण्णा हजारेच उपोषण " पवार सरकार भ्रष्ट अधिकार्यांना पाटीशी घालतय " असल्याचा आरोप.. ते काही दिवसापुर्वीच लवासा प्रकरण इ . पण चातुर्याची बाब म्हणजे आरोप झाले ते सिद्ध कोणीच करू शकल नाही . म्हणून तर एका दगडात दोन पक्षी मारून मी दगड मारलाच नाही इतक्या चातुर्याने राजकारण खेळणार व्यक्तिमत्व ह्या आताच्या महाराष्ट्रात व देशात होणे नाही .

शरद पवार साहेब .. वयाच्या २९ व्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्री मंडळात तुम्ही समावेश केला , चार वेळा महाराष्ट्राच मुख्यमंत्री पद भूषवल , महाविद्यालीन वयात भर तारुण्यात सळसळत रक्त घेऊन यशवंतरावा समोर छाप पाडून युवा वर्गाचा नेतृत्व करून ,कॉंग्रेस मधून बाहेर पडून, कॉंग्रेसच्याच बरोबरीने बसून राजकारण खेळून , पुलोद पासून ते आता पर्यंतच तुमच राजकीय कारकीर्द आणि त्यात सहकार शेत्रात असणार तुमच वर्चस्व , केंद्रीय मंत्री मंडळातल तुमच वजन हा सर्व कार्याचा पसारा मुंबईतल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणाच देणार ठरेल. मा. श्री. बाळासाहेब गेल्यानंतर मुंबईतल्या राजकारणात खूप मोठी पोकळी तयार झालीय . बाळासाहेबा नंतर या मुंबईकरांच वडीलधारी ( राजकीय ) छत्र नाहीस झालय . त्यांच्या जागेवर आता कोणी येईल अस वाटत नाही .. परत मुंबईत वाघाची डरकाळी होणे नाही . म्हनून आपण म्होरके होवून राजकीय वडिलकीच्या नात्याने मुंबईतल्या तमाम मराठी बांधवाना दिशा व मार्गदर्शन करावे हीच तुमच्या वाढदिवस निम्मित मुंबईकरांच्या मनातून सदिच्छा ... जय महाराष्ट्र- सचिन कृष्णा तळे

Saturday, 8 December 2012

---------------------------------------------
कविता :   आमुची भाषा
=========================


कशी कळेल तुम्हास आमुची भाषा
कशी वळेल तुम्हास आमुची भाषा

मातीत या आमच्या सुगंध मराठीचा
देश हो ! जिंके अमृतास आमुची भाषा

इतिहासाच्या पानावरी छाप मराठ्यांचा
धारदार त्या सह्याद्रीस आमुची भाषा

हिंदू तेजाचा सूर्य नांदे शिवनेरी
लढते आज जगण्यास आमुची भाषा

प्रिय मां भारती प्राणाहुनी सरताज
लोक हो तुम्हा स्वागतास आमुची भाषा

मराठीया नगरी संतांची असे दाटी 
रणा गणात तलवारीस आमुची भाषा

इथल्या मातीत अंकुरते बीज संस्कृतीचे
कलेच्या घागरी भरण्यास  आमुची भाषा

शोध कितीही वाळवंटात अनेक  भाषा
हृदयातूनी बोलतो देवास आमुची भाषा

-----   सचिन तळे  2012

Monday, 12 November 2012

चुलीवरच प्रेम ....

मुळात विश्वाची निर्मिती हि प्रेमातून झालीय, संपूर्ण विश्वाला एका शब्दात सामवणारा शब्द म्हणजे प्रेम . मंग हे विश्व ब्रह्मांड असो वा चार भिंतीतल घरकुल आणि घरकुल म्हंटल कि , चूल व मुल या दोन शब्दांची भर पडतेच पडते . घरट्यातल घरपण हे घरात वावरणाऱ्या त्या चार पाखरांवर अवलंबून असत आणि त्या नात्यात उमलणार प्रेम म्हणजेच चुलीवरच प्रेम .. घर म्हंटल कि भांडण , तंटा , जिव्हाळा ..रडण , हसन , रुसन ..एकमेकांना फसवण , समजवण , समजून घेण ..
ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला जाणवतात . जसे भाजी मध्ये मिट , मिरची , साखर इ. बाबीमुळे भाजी जशी चवदार बनते तसेच ..संसारच्या ह्या चुलीवर हि भांडणामुळे प्रेम अधिकच मजेदार होत .
दररोज सकाळ पासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या भोवताली कोणत्या तरी एक घरात नवर्या बायकोच भांडण हे चालूच असत किवा दिसतच दिसत. कधी कधी आपल्या घरात हि  .. ते दृश बिनचूक आढळत . एकमेकांची जीव घेणार कि काय ? असच दृश हे जगा समोर तयार करत  असतात . मंग ते आजू बाजूस कोणी आहे का ? लोक काय  म्हणतील ह्याचा काडीमात्र
विचार न करता एकमेकांच पक्के वैरी गत वागतात . अन उलट दुसर्या दिवशी पाहिलं
कि हातात हात घेऊन बागेत फिरताना दिसतात .पण त्यावेळी त्यांच्या भांडणात जो पडतो तो पक्का
त्यांचा वैरी झालेला असतो . मी हि आतापर्यंत आई वडिलांची भांडणे खूप वेळा पहिली  आणि अनुभवले आहे पण कधी त्यांच्या मधी पडण्याची धाडस केल नाही , कारण दुसर्या दिवशी
आईचं बाबांना डबा बनवून देते अन बाबा आईला संध्याकाळी  स्वपाकांत मदत करताना दिसतात .
काही दिवसापुर्वीची गोष्ट आहे ..कामावरून घरी परताना एका घरात जोरदार भांडण चाल होत , पण त्या भांडणातून काही तरी वाईट घडल अस चित्र मला दिसलं नव्हत , वाटल कि धाडस कराव अन जाऊन ते भांडण सोडवाव पण त्यावेळी मला कॉलेजचा वाटेवरच एक प्रसंग आठवल . आमच्या कॉलेजच्या बाजूला एक चाळ होती. मी आणि माझे काही मित्र styand  वर चालो असताना
त्या चाळीतल्या एका घरात जोरदार भांडण चालू होत . नवरा हा दारू पिऊन त्याचा बायकोला शिव्या गाळ करत मार झोड करत होता . आम्हाला ते बगवल नाही , आम्ही सरळ त्याला गटाला त्या बाई ला बाजू सारतत्या नवर्याचा काना खाली चार वाजवली आणि सरळ पोलिसांकडे घेऊन गेलो ..
आणि घडलेली सर्व घटना पोलीस अधिकारीना सांगितलं .. पोलीस त्याला दम देणार तेवढ्यातच
 ती बाई पळत आली आणि आम्हालाच चार शब्द सुनवून गेली " माझा नवरा आहे तो मला मारेल किवा माझा जीव घेईल तुम्हाला काय त्याच ... सोडा माझ्या नवर्याला .." हे वाक्य एकूण मलाच माझ्या थोबाडीत मारल्या वाणी झाल. मंग त्यावेळी त्या पोलीस अधिकारी नि
 समजावलं कि ..  “ अरे मुलानो हे चुलीवरच प्रेम आहे चूल पेटवली तरच पोट भरत , संसार चालत ..अन चूल पेटली तर चटके  हे बसणारच. “
सचिन कृष्णा तळे

Wednesday, 19 September 2012

स्रिया....

अंधाराच्या वाटेवरी भरडताहेत स्रिया

जन्मा आधीच डोळे मिटताहेत स्रिया

आई म्हणू कुणास ,कुणास म्हणू ताई
वारसदारा पाई बळी पडताहेत स्रिया

इतिहासा परी झळकल्या झाशीच्या तलवारी
कसे वासानांतरी चिखलात रुजताहेत स्रिया

वसुंधरेच लेन लेऊन सजते ती माहेरी
सासरच्या जखमेने रोज रडताहेत स्रिया

सृष्टीची नांदी तिच्या पदारातच नांदत असते
विसरुनी सारे दुख रोज जगताहेत स्रिया


- सचिन तळे

Saturday, 21 April 2012

काय म्हणू र , काय मी दादा


काय म्हणू र , काय मी दादा
आल वादळ , माझ्या दारा

चार भिंती शेनामातीच
छपर माझ वाऱ्यावर
नभासवे धरणाला पाझर
आला धो धो करत दारा
काय म्हणू र , काय मी दादा

होती चार भांडी फुटकी
घेऊन गेली ती हि बाई
नव्याने होता संसार थाटला
आज डोळ्यात पाणी पाणी
काय म्हणू र , काय मी दादा

नकोस ईचारू तुझ्या ताईला
फाटकी लुगडी आहे अंगाला
शेत गेल भिजून सार आज
धनीस बसला नशिबी चटका
काय म्हणू र , काय मी दादा

नकोच मला धनाची पोटरी
हवी माहेरची मायाळू भेटी
वहिनी घेईल का रे दारा ?
देशील का रे थोडा सहारा
काय म्हणू र , काय मी दादा

आता कुठे थोडस उन दिसलं
नभातून काळ दैतघन हे पुसलं
फक्त मन हळवं कराया आले
माहेरी मिळेल का रे सात्वन दादा
आल वादळ र , माझ्या दारा - कविरंग सचिन तळे

Sunday, 8 April 2012

निमित्त होत तिच्या माझ्या लग्नाचा

मी गेलो होतो दारी तिच्या
सोबत चार पाहुण्यांचा होता विडा
डोक्यावर होता पदर तिचा
नजर होती बावरी
कांदे पोहेच्या हर एक शेंगदाण्यावरी
प्रेमात पडलो मी तिच्या वरी

निमित्त होत तिच्या माझ्या लग्नाचा
डोक्यावर बाशिंग बांधण्याचा 
तिच्या बरोबर बोलताना
जीवच भांड्यात पडला होता
तिच्या हून जास्त लाजण्याचा
श्रुंगार माझा सजला होता

तिने होकार दिल्यावर
मी अचानक बावरलो
स्तब्द झालो त्या क्षणी, अन कळलच नाही
मी तिच्या  बरोबर ,
आजून काय काय कुजबुजलो

मंग कुठे जाऊन
पंडिताच्या पोतीवरी , लग्नाची तारीख ठरली
गोड झाले सर्वांचे तोंड
लहानांना आले हसू
जणू  ,शाळेची सुट्टीच ठरली

जावाई बापू म्हणत म्हणत
एक म्हातारी समोर आली
अन बुंदीच्या लाडूचा मला
चांगलीच कसरत करायला लावली

ती होती माझ्या शेजारी
म्हणत होती आई नि मामी
" काय, लक्ष्मी नारायणाचा जोडा, आहे कि नाही "
मी चुकून म्हणालो " हो "
आन ती हळूच गालात लाजली

मंग जाताना , जड पाउलांनी
मी तिला मागे मागे वळूनी पाहत होतो
तिने एक छोटीशी स्माईल दिली
अन परत तिच्या प्रेमात मी
असा काही पडलो
कि आता रात्र दिवस फक्त
तिलाच आठवत बसलो - सचिन तळे 08/04/2012

Saturday, 31 March 2012

जसा कळपात हरीणपाडसा

कसा शोधू मी कसा , तुला ग सखे सांगना
हूर हूर मनी भावला असा , जसा कळपात हरीणपाडसा

हरवली सखी साजणी , रानमाळी कुठेच दिसेना
धीरावा धरू मी कसा . हृदय हे वेडावला असा

हे रान सार सुने , सुनी  जाहले हे अंबर घना
फिरावा कुठवर नजरांचा तुंरा, तुला शोधता शोधता

तू नाजूक फुलांचा आरसा , तुज भोवती सुरंग पारध्याचा
लढा मी कसा , द्यावा आत्ता , तुज ठाव ना कुणा

कुठवर पाहू आता , आकाशी पेटला जाळ चांदण्याचा
भडकावा वणवा अन जळावा , तुझ्या विरह रुपी शब्दांचा पेंढा

हे गणा विनवणी तुला , प्रीतीच्या पाखरांचा उडू दे थवा
हूर हूर मनी भावला असा , जसा कळपात हरीणपाडसा - सचिन तळे

Friday, 30 March 2012

दऱ्या खोरयातून चाले नार सतरंगी

दऱ्या खोरयातून चाले नार सतरंगी
तिच्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II धृ II

ती रानमाळाची , नागीण हिरकणी
सांज चांदण्याची , ती लवलवणारी पापणी
मधुभाव संगिनी , तू ग किशोरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II १ II

ती फुल रान कळी, निळ्या पलंगाखाली
बोलक्या नेत्राची , ती रानवय गाणी
चंचल मंजुळ , तू ग नवथर लहरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी  II२ II

ती हिरव्या रानाच , पाखर भिरभिरणार
श्रावण रंगाच , ती  इंद्रासय दरबार
मदन गंधाची , तू ग नाच मयुरी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II३II

ती लाजाळूची पात , लाजणाऱ्या ओटी
चाफ्याच्या श्रुंगाराची , ती गीत सुमनाची
पुनव चंद्राची , तू ग राघिनी
तुझ्या रूपाने , वाजे काळजात प्रीतकिंकारी II४II - सचिन तळे

Saturday, 24 March 2012

माझे शब्द मांडले अनेक

ती मावळून पेटली , वनव्या परी अंग अंग
मी जाळ होऊनी विझलो , घेऊन तिचे छंद अनेक

ती भर उन्हात सावल्यांचा , खेळ मांडते नव्या गीतान
मी त्याच गीतांच्या लहरीचा , छेडीतो  सूर-सेतू अनेक

ती क्षणभर थांबते , घेऊन सुसाट वादळी लाट
मी त्याच वादळावरी , कोरिले चित्र तिचे अनेक

ती रंगाहून रंगते , सजवून श्रुंगार अंतरंग
मी त्याच श्रुंगारात  बुडवली , नशेत रात्र रात्र अनेक

ती प्रीत विझूनी गेली , कळपात नव्या रुपानं
मी त्याच रूपावर , रक्तातून काव्य सांडले अनेक

ती विरली काळजात , विरहाच एक रोप पेरून
मी त्याच पाना पानावरी , माझे शब्द मांडले अनेक - सचिन तळे

Sunday, 18 March 2012

राजकारण म्हंटल कि चिड चिड होते …


राजकारण म्हंटल कि चिड चिड होते  …
एक होता कामकरी , कष्टाने रोज रोज घामगाळी , सुखाने खायचा भाकरी , वय होत ६० च्या घरी . भेटला होता वाटेला ,वडाच्या  झाडा कडेला , चेहरा होता तापलेला , कोणावरी  तरी होता चिडलेला. झिजली होती चप्पल जणू चकरा मारून मारून , हाथात होती पिशवी कागदपत्रांनी भरलेली . जाणिले होते मी हि हे मनी , अन विचारले बाबास मी , बाबा म्हणाले ...
राजकारण म्हंटल कि चिड चिड होते , मनात राग हळूच फुलते , उमटते डोळ्यासमोर फक्त ह्या नेत्यांचे चित्रे , कधी न विसरणारे , तेव्हा आठवते ,एक काळी आपणच ह्यांना आदर्श मानले होते , आले होते दारी , घेऊन मतदानाची पोटरी , त्या पोटरीत मत आपणच दिले होते . अनेक रंगाचे झेंडे घेऊन , चिन्हांचे बिल्ले मिरवत , प्रचारात आपणच फिरलो होतो . ताई- माई -आक्का म्हणत बोंबा मारले होतो , एक एक वडापाव वरती सारी भूक होती विजवली .बंक मारले होते , शाळा व कॉलेजचे , कामावरून सुट्टी घेऊन रोज रोज पक्ष्याच्या कार्यालयात रात्र - दिवस होते काडले. घर दार सर्वच होते पेटले , ईतक होत मनात हे राजकारण भिडले .आशा होती त्याची हि निराशा झाली , कोण कुठला तो उमेदवार , बाशिंग लाउनी रिंगणात , जिंकून आल्यावर त्याने हि पाटमोरी दाखवली , आता राजकारण म्हंटल कि खरच चिड चिड होते . 
“ अरे लेकरा ” , नको नको हे राजकारण , जरी म्हणतो बर ते आपल घर दार , तर सकाळ संध्याकाळ , वृत्तपत्रात व टीव्हीवर ह्यांच्याच बातम्या पाहतो , अन चार चौघात , गावाच्या वेशीला , त्यांच्याच रंगत रंगतो , मंग कधी कधी हि राजकारणी भेळ अशी काही तिखट गोड होते कि , मैत्रीत हि गट बाजीचे हळूच मिट पडते. भाव भावाचा होतो वैरी , सत्याच्या खुर्ची पाई , लाल रक्ताचे गुलाल उधळले जाते , भारतीय संस्कृतीच्या करून चिंध्या चिंध्या असे हे राजकारण शिकवले जाते . नको नको म्हणता परत राजकारण च समोर येते . अन सरकारी खात्याच्या हर एका कागदावर , ह्यांचीच गरज भासते , आजू बाजूच्या बडव्यांना चार चारावे लागते . दहा चकरा मारून नंतर मंग हि जीवघेणी सही उमटते . झिजते चप्पल आपली तरी त्यांचीच वाह वाह करयाची असते , ज्याला त्याला सलाम ठोकत , सरकारी काम जे पूर्ण करयचे असते. काय करणार , सरकारी कामाशिवाय कुठलेच पान हालत नाही. रेशनीग खात , जल खात , वीज खात ई . हे विभाग ते विभाग , कंत्राटात  हि त्यांचीच दादागिरी चालते , खरचं राजकारण म्हंटल कि चिड चिड होते
गंभीर होता विषय , विचारात पडले माझे सारे शब्द , कोण बरा ह्याचा दोषी ? विचारले स्वतास मी , तेव्हा कुठे टूब पेटली , अरे मतदार आहे न मी . मंग मीच नाही का ह्यचा  दोषी . सरकार असो वा नसो , रस्त्यावर खडे मात्र कायम आहे , सुविधाच्या नावाखाली असुविधाची शाळा मात्र आहे , शेतकर्याची जमीन विकासाच्या नावाखाली उद्योग -  -पतिच्या पोटी , अन बळीराजा कर्जबाजारी होऊन मात्र फासावर्ती , गाव गावात  विजेचा व पाणीच पत्ता नाही .शाळा व कॉलेजात ट्रस्टी च्या नावाशिवाय जागा नाही . नोकरीत हि वशिले पण नडतो , कोर्टाच्या पायऱ्या चडून चडून सामान्य माणूस थकतो , जितक गुन्हे तुमच्यावर तितके तुम्ही मोटे , सामान्य माणसासाठी सारेच नियम खोटे . कसाब व अफजल ला रोज रोज बिर्याणी अन पोलिसांच्या पदरी  २४-२४ तास रात्र दिन पाळी . परत पाच वर्षाने तेच दिवस उजाडते , हेच सारे प्रश्न घेऊन राजकारणी लोकांची फौज येते ,अन परत मंग एकदा हे राजकारण म्हंटल कि चिड चिड होते.
अन परत मंग एकदा हे राजकारण म्हंटल कि चिड चिड होते.

    - सचिन कृष्णा तळे

भूलण्यास तुझे प्रीत गंध ....


सावरले मनास आज , फुलवुनी नवा साज 
ओंजळीत घेतले फुलास , भूलण्यास तुझे प्रीत गंध …

तू नाही आस पास , नाही आज छळतात तुझे भास
स्पर्श आंधळे झाले , झाली पुसट दोघांची रास
दूर दूर या वाटाण वरती , दिसू  लागली तू अनोळखी
तो फुलण्यास येतो . भूलण्यास तुझे प्रीत गंध ....

का उगाच हा रुसवा , का उगाच हा दुरावा
रुद्यात माझ्या मावळला , आज का तुझा चेहरा
सखे सांग ना कळ्यानस या , फुलेना तुझ्या विना
तो बहरण्यास येतो , भूलण्यास तुझे प्रीत गंध ....
कसे आठवांचे ठसे , पुसले सागराच्या कुशीत
का डोळ्यांतल्या अश्रुचे , वादळ मी केले मुठीत
किती क्षण हे उमटले , विरहाच्या पाना पानात
तो शोधण्यास येतो , भूलण्यास तुझे प्रीत गंध…
आता नको परत प्रेमाचा , फसवा खेळ सारा
एकटाच ह्या काव्यात मी , एकटाच माझा किनारा
पण रुद्यात अजून जळते , तुझ्या भेटीचा विसावा
तो एकांतास येतो ,  भूलण्यास तुझे प्रीत गंध…      - सचिन कृष्णा तळे

Wednesday, 23 November 2011

नका हिणवू मला व्येश्या म्हणुनी

नका हिणवू मला व्येश्या म्हणुनी

मी अबला नारी , कोणाच्यातरी घरची
कसे वासनाच्या दारी , हा देह सांडला मी
काळजावर ठोकून शिळा , हा बाजार मांडला मी

जन्म हि माझा तसाच , जसे जन्मले तुमच्या मुली
डोळ्यात माझ्या हि तेच स्वप्ने , जे पाहता तुम्ही
स्री आभूषण कधीच पेटवले , पेटलेल्या अंगाने
पुसून सारी स्वप्नावली , हा बाजार मांडला मी

दूर राहिले घर दार , दूर सारी नाती गोती
कोणाच्या तरी पोटाची खळगी , भासते रोज मनी
म्हणुनी ह्या देहाची , सजवली रांगोळी , अंगणी
घेऊन हजार घाव , हा बाजार मांडला मी

लोटता मला आज , दूर या समाजातून
व्यथा समजणार कसे , नाही डोळ्यात तुमच्या तो पूर
मी व्येश्या म्हणुनी न्हवती जन्मली , पण मरतेय व्येश्या म्हणुनी
कधी विचारून पहा मनी , का बाजार मांडला मी

तीरसकाराच्या नजरांनी पाहता , म्हणता मला बाजारी
हस्ते तेव्हा , पाहून देवाला , वसवलेल्या अंतरी
नश्वर या देहाचा आज बाजार मांडला मी
कधी चालून बघा ह्या वाटा , किती काटे टोचल्या रुद्यी
का ? बाजार मांडला मी ....- सचिन तळे

Monday, 14 November 2011

आता राम राम सांगा

आले चार खांदे , आता राम राम सांगा
आठवणीच्या फांदीने , हे शरीर माझे जाळा

जन्मा पासून मृतूचा , प्रवास मी गाठला
कधी हसत कधी रडत , वैकुण्ठ सापडला
नका नका डोळ्यातून ह्या आश्रुच्या धारा
मलाच दुख होतंय सोडून तुम्हास जाताना

नव्हते काही येताना , जाताना हि काही नाही
माझ माझ म्हणार, अस्तित्व पुसलं एका क्षणामधी

आता हिशोब लागणार माझे , पाप आणि पुण्याचा
मिळेल कदाचित मला , पुन्हा माती मानवी जन्मचा
मी म्हणेल तेव्हा , देवा नको हा मानवी धर्म
कलयुगात सर्वांच्या , घरी वसतो हा गर्व

एकच सांगणे सर्वाना , कोणी नाही कोणाचा
आल्या जन्मी द्यावा आनंद , चहूदिशांनी चैतन्याचा
स्वर्ग व नर्काच्या , उंबरठ्यावर मी उभा
आठवणीच्या फांदीने , हे शरीर माझे जाळा
आता राम राम सांगा....

 - सचिन तळे 15/11/2011

Tuesday, 8 November 2011

हा किनारा

हा किनारा सागराचा , वाळूकनाचा, स्वप्नांचा

अलगत स्पर्श करणाऱ्या , माझ्या कवीमनाचा
सागरी लाटांचा , शंख शिंपल्यांचा , मोतींचा
नकळत उमटणार्या ,या माझ्या शब्दांचा ...

हा किनारा माझ्या बालपणीचा , तारुण्याचा
हळुवारपणे खेळणाऱ्या माझ्या मित्रांचा
मस्तीचा ,उनाड्केचा , भिर भिरनाऱ्या पाखरांचा
टपोऱ्या रंगाचा, या माझ्या बालमनाचा ...

हा किनारा माझ्या साजनीच्या , आठवणीचा
नकळत फुलणाऱ्या तिझ्या माझ्या प्रेमाचा
बोलीचा , स्वप्नांचा , रुसणाऱ्या क्षणांचा
वेगळ्या अनुभवाचा ,या माझ्या प्रीयसीचा ...

हा किनारा माझ्या एकांताच्या रस्त्याचा
अडखळत पडणार्या माझ्या पाऊला पाऊलांचा
शांततेचा , झाडावरूनी गळणाऱ्या पाना फुलांचा
थकलेल्या हातांचा , या माझ्या उत्तरायनचा ...

हा किनारा असाच आहे , जसा होता
फक्त बदला हा माणसाचा चेहरा
त्याच लाटा , तीच भरती , अन तीच आहोटी
उरल्या त्या फक्त आठवणीच्या गोष्टी

- सचिन तळेTuesday, 18 October 2011

फुलांची आज माळ गुंफली
तव प्रीतीच्या चरणा वरती
वेली वाणी कळ्या गुंतवले
तुळशीच्या पानांनी ...
उट नाथा पहाट झाली ,आली दाराशी

तेजोमय दीप उजळले
कळसाच्या त्या गाभारी
नादस्वर गुंजते गुंजते
स्वर्गाच्या महाली ...
उट नाथा पहाट झाली ,आली दाराशी

किरणांचा थाट सोनेरी
घेऊन निरांजन उभे पुजारी
मुख कमल दावा देवा
मोरपंखी हे मुरारी...
उट नाथा पहाट झाली ,आली दाराशी

दूर कुठून वाजते बासरी
ऐकू येते कोकीळ गाणी
आनंदी , हा नंद चहू दिशांनी
अंतरंगी अंतरंगी ...
उट नाथा पहाट झाली ,आली दाराशी

- सचिन तळे
18/10/2011

Saturday, 15 October 2011

माझ्या मनातील


चाफ्या फुलाची तू, कोणत्या रानातली तू

सांग , सांग तू कोणत्या गावातली तू
आहेस का तू कोण्या राजाची राणी
का? माझ्या मनातली , तूच साजणी

अंतरेतली तू , कवीच्या कवितेतली तू
सांग , सांग तू कोणत्या स्वर्गातली तू
आहेस का तू कोण्या इंद्राची सुंदरी
का? माझ्या मनातली , तूच साजरी

नक्ष्त्रातली तू , चांदण्यातल चंद्रकोर तू
सांग , सांग तू कोणत्या गीतातली तू
आहेस का तू कोण्या शुक्राची चांदणी
का? माझ्या मनातली , तूच राघिनी

रसगंधातील तू , सप्तसुरातील सप्तरंग तू
सांग , सांग तू कोणत्या श्रावणातील तू
आहेस का तू कोण्या पाऊसाची सरी
का ? माझ्या मनातील तूच , बावरी


सचिन तळे 
15/10/2011

Tuesday, 11 October 2011

कृष्णाच्या प्रेमाची साखळी ....

रंग रंगी रंगतो , हा श्याम वृन्दावणी

खेळ खेळी खेळतो , प्रेमाची घेऊन साखळी
हर ऐका रुपात ,सुरात , वाजते कृष्णाची बासरी
ऐका सांगतो , माधवाची हर एक प्रेम कहाणी ...

आई च्या प्रेमाची , आस लावली कान्हा नि
कधी देवकिस तर कधी यशोधेच्या गावी
बाळ कृष्णाची , नटखट लीला ती न्यारी
सवंगडी सोबत फोडी , माखांच्या घागरी
ऐका कृष्णाच्या प्रेमाची साखळी ...

प्रेम फुलांचा वर्षाव केला , राधा संग गवळणीच्या मनी
रुक्मनी उभी विटेवरी , सावळ्याच्या दारी
यमुनेच्या काटावरी , रास लीला करे हरी
सत्यभामा वाट पाही , कृष्णाच्या प्रेमाची
ऐका माधवाच्या प्रेमाची साखळी ...

द्वारकेचा राजा वसे , सुदामाच्या हृदयी
बंधुतावाची ज्योत जळते , बलरामच्या अंतरी
चोरिले माखन त्याने , मित्राच्या प्रेमा पोटी
मानवी रचिले मनोरे , फोडली दहीहांडी
ऐका कान्हाच्या प्रेमाची साखळी

विष्णू रूप दाविले , अर्जुनास मैदानी
जन रक्षणास गोवर्धन उचलले , करंगळी वरती
दुष्टांचा नाश केला , मारिले कंसास हि
द्रोपदीची लाज वाचुनी , वसला सर्वांच्या मंदिरी
ऐका सांगतो , माधवाची हर एक प्रेम कहाणी ...

सचिन तळे
11-10-2011

Tuesday, 13 September 2011

या कळ्यानो या ....या कळ्यानो या , फुले व्हाया

जन्म हा मिळाला , सुगंध द्याया
इथल्या हिरव्या हिरव्या पाना पाना तून
लपून मोहरा वया , या कळ्यानो या .....

तुम्हा फुलवण्यास , हा ऋतू आला
पाकळ्यांवर सप्तरंगाची , उधळण करावया आला
श्वास हळू घ्यावा , चोरून पाहतोय चावट भुंगा
घेऊन मधाचा गोडवा , या कळ्यानो या .....

उघडा पाकळी नयन , लाजऱ्या रुपान
पहाट हि आली , कोवळ्या उणान
हलक्या हलक्या या स्वप्नानो या, खरे व्हाया
तुम्हाविन आतुर निसर्गराजा , या कळ्यानो या .....

चहू बाजूनी फुलू दे , पाकळ्यांचा थवा
पाहून तुला आठउ दे, साजनीच्या आठवणीचा तुरा
तुझ्या भोवताली , प्रेम वीरांचा जमेल मेळा
रेशीम गाट प्रेमाची जुळवण्या , या कळ्यानो या .....

पण सावध तेचा, घे इशारा
तुला मिळवण्यास , संपवतील तुजला
काट्यांचे कुंपण घालूनी , या पहावयास जगाचा पसारा
या कळ्यानो या , फुले व्हाया....


- सचिन तळे  

Sunday, 28 August 2011

श्रावण...


पाउसाच्या मोहक थेंबात , श्रावण हे सजले

भिजुनी अंग अंग , ओले चिंब , मन हे भिजले

पहिल्याच श्रावणाचा , गंध हा दरवळला
पहिल्याच सरीचा , ओला हा शब्द माझा
पहिल्याच पाऊसाचे, धरणी माय बोले
पाउसाच्या मोहकतेत , श्रावणाचे अबोल गाणे

कुठून आले गर्जणारे , मेघ हे ओले
कुठून फिरल्या श्रावणातले गार गार वारे
कुठून पडली हिरवी पान नक्षत्राची चांदणी
कोणी केली या पाउसाच्या थेंबात, मोहकशी करणी

नव्याने हर्ष हा , भुवनी दाटला
नव्याने मोरपंख, नभी इंद्रधनू फुलला
नव्याने धुक्याची , चादर हि रंगली
नव्याने गारटण्याची , चाहूल हि लागली

आताचं कुठे या मातीला कस्तुरी रंग चडला
आताचं कुठे नव्या पर्वाचा अंकुर हा भिजला
आताचं कुठे घेतला वसा ह्या श्रावणाचा
आताचं कुठे या पाऊसात , कवीचा शब्द उमटला

-सचिन तळे   29/8/2011Friday, 26 August 2011

काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं


काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं
मन थोडेसे हसले , अन फसलो म्हणाल , का?
ते कळलंच नाही , फक्त फसलो म्हणाल ...
फसलो ते तिच्या बोलण्यात , तिच्या हसण्यात
तिच्या नशेली डोळ्यात ,तिच्या रुसण्यात...
जसा कृष्ण राधेत , राम सीतेत
पण हे फसणे हि मला खूप आवडल
खरच , काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं ...

आता तू जवळ नाही , जवळ आहे ती फक्त आठवण
रचलेल्या कवितांमध्ये, फक्त तुझी साठवण
गावाच्या वाटा तर कधीच विसरलो
कळलच नाही मला ,प्रेमाच्या वाटेवर मी कधी घसरलो
सोबत नाही आता कोणी , मित्रांचा थवा हि कधीच दूर झाला
परत , मन एकांतात फसलो म्हणाल
पण हे फसणे हि मला खूप आवडल
खरच , काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं ...

रोज रोज हट्ट तूच करत होतीस
माझ्या हाताला धरून , जगाशी सवांद तूच साधत होतीस
हट्ट हि तुझाच होता ,माझे शब्द हि तूच होतीस
खोटे पडले शब्द सारे , खोटे झाले तुझे हसणारे ओट हे
तुझा माझा स्पर्श हि खोटा , अन
माझ्या तुझ्या प्रेमात लुक लुकणारे तारे हि खोटेच ठरले
मन थोडेसे हसले , अन फसलो म्हणाले
पण हे फसणे हि मला खूप आवडल
खरच , काल खूप दिवसांनी, तुझे माझे क्षण आठवलं ...


सचिन तळे   26/08/2011

Monday, 22 August 2011

रंग श्रावणाचा .....


सावळे रंग रंग , कृष्णा सवे श्रावणी दंग दंग
हिरव्या गार वनात , श्रावणाचा हा छंद

धुक्याच्या अंत अंत , पहाट जागली शांत शांत
नादस्वर घुमतो क्षणांत , श्रावणाच्या मंदिरात

उंच उंच डोंगरआड , झरा वाहतो अंगणात
आतुर मिलनास , श्रावणाच्या सागरास

कुहू कुहू कोकीळबोले, नभात पारव्याचे गाणे
नाचते मयूर सारे , श्रावणातल्या ओल्या चिंब सरीने

मातीत गंध गंध , दरवळे चंदनात कस्तुरी मंद
मोहक वाटते सुवास , श्रावणातल्या या विश्वात


- सचिन तळे 22/08/2011


Tuesday, 16 August 2011

ह्या श्रावणी ...सांगा कोणीहा श्रावण , मनी भावण , ह्या क्षणी
सांगा कोणी , शिंपडले पाउसाच्या सरी .. ह्या श्रावणी

ह्या श्रावणी, नभात उमटली कशी , रंगाची छबी
सांगा कोणी , आणिले इंद्राची नगरी...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , मोतियाचे दाणे , सांडले गवताच्या पातीवरुनी
सांगा कोणी , पाहिले दवबिंदूचे ते नाणी ... ह्या श्रावणी

ह्या श्रावणी, चिंब चिंब भिजुनी , सजली गोकुळ्यातली गवळणी
सांगा कोणी , अडवल्या कृष्णाच्या घागरी ...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , नार चालली , नदीच्या तीरी
सांगा कोणी , दाविली वाट राजाच्या दारी ...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , कवटाळून घेती , धुक्याच्या चादरी
सांगा कोणी , घातल्या हिरव्यागार नीरा भुवनी ...ह्या श्रावणी

ह्या श्रावणी , मयूर नाचती , सरीच्या लहरी वरी
सांगा कोणी , ऐकले कोकिळेचे गाणी ...ह्या श्रावणी

सचिन तळे  16/08/2011

Tuesday, 9 August 2011

नकळत आपल्या प्रेमाचे काव्य मीच रचतोयमी श्वास रोखून फक्त तुझी वाट पाहतोय
रोज येड्यागत तुझ्या आठवणीचे गाणे गातोय
शब्द रचता रचता संपवण्याचे प्रयत्न करतोय
नकळत आपल्या प्रेमाचे काव्य मीच रचतोय

भिजली होतीस काल तु पाउसात चिंब चिंब
हळूच पाहिले होते मी, तुला ह्या पाउसात ओले चिंब
आजून हि आठवतीय , तुझ्या माझ्यातला प्रेमविलास पाउस
पण काल चा पाउस माझ्या डोळ्यातून फक्त रडतोय
नकळत आपल्या प्रेमाचे काव्य, मीच रचतोय

सांजेस भेट हि ठरली होती तुझी माझी
त्या सांजेला तु भेटली होती मला एकटी
जाताना तुझा डोळ्यात होती अश्रुंचे फुले
माझ्या हृद्यात निवडुंग तूच पेरून गेली होती
ह्या निवडुंगाला पाणी माझ्या आश्रुनी वाहतोय
नकळत आपल्या प्रेमाचे काव्य, मीच रचतोय

कळत नसेल तुला किती त्रास मला होतोय
माझ्या शब्दांना, माझ्या काव्यांना, माझ्या विचारांना
मी तुझ्या आठवणीतच का बुडवतोय ?
तु आली अन गेली अलगत वाऱ्याच्या झोक्यावानी
ह्या वाऱ्याच्या झोक्याना, मी का रोखतोय
खरच आपल्या प्रेमाचे काव्य, मीच का रचतोयMonday, 8 August 2011

राजसा येऊ कशी मी आज ...


सांगू कशी , येऊ कशी
अडवते हि लाज ,मला फसवते हि रात
राजसा येऊ कशी मी आज ...

येता येता वाटेवर चंद्र भेटला
विचारता मला गालात हसला
सांगेल घरी जाऊन माझ्या आईला
भीती वाटी मनाला , म्हणून गेले घरला
राजसा येऊ कशी मी आज ...हळूच सांगना

पाटला करतोय कोणी तरी , सावलीच्या आड
सोडत नाही साथ माझी , अडवतोय पायवाट
रातराणीला उठ्वितोय , काजव्यातील आग
राजसा येऊ कशी मी आज ...

पदर घेतले डोक्यावरी , ओळखू नये कोणी तरी
श्वास हळू हळू घेत ,चालली पायाची चालतीरी
एवढ्यात कोणी तरी, दिली मागण मला हाक
तो तर होता फक्त तुझा माझा भास
राजसा येऊ कशी मी आज ...

निजलेल्या डोळ्यांना , तुझ्या आठवणीने भिजवल्या
भेट घडेल कशी , रात्र नाही हि निजली
एकटक पाहते मी तुझी वाट
राजसा येऊ कशी मी आज ...
अडवते हि लाज ,मला फसवते हि रात
राजसा येऊ कशी मी आज ...
Friday, 5 August 2011

मधुचंद्राची रात्र.....


लाजल्या लाजाळूच्या पाकळ्या
पाकळ्यात निजले रातराणीच्या कळ्या
कळ्या कळ्या मध्ये सजले , मधुचंद्राची रात
रात्रीला चंद्र देतो , हळूच मदनाला साथ
हि रात्र गुलाबी पाकळ्या अन कळ्याची
हि रात्र तुझी माझी , नव्या फुलाची

कीर कीर करणारे तारे , हळूच करती आवाज
आवाज तुझ्या माझ्या हृदयाची , ऐकते हि सांज
सांज लपली तुझ्या डोळ्याच्या , काजळात
या काजळात घडेल तुझा नि माझा संवाद
हा संवाद नशेली , रात्रीच्या अंधारात
हा संवाद तुझा माझा , नव्या स्वप्नात

एकटीच तू अन एकटाच मी
तुझ्या सहवासात क्षणभर , जगा फितूर मी
ओटाना स्पर्श होता , गीतांना येती जाग
तुझ्या माझ्या मिलनात , हृदयात वाजती तार
हे मिलन मदनाचे , उघडे द्वार
हे मिलन तुझे नि माझे , नव्या स्वर्गात

एकरूप जीव झाले , क्षण वितळले क्षणात
नजरांचा खेळ संपला , घेतला असा श्वास
सावल्यांना हि कळले नाही , कोण आहे कोणाचा धनी
अंतरात गुरफटून गेली , नव्याने उमलणारी पात
हे क्षण स्मरणात , आठवणीच्या गावात
हे क्षण तुझे न माझे , पाहे नवा प्रकाश


सचिन तळे 04/08/2011

Thursday, 4 August 2011

जन्मलो मी मराठी ...


हि भूमी, माय भूमी ,मराठी माझी
मी धन्य धन्य जाहलो , जन्मलो मराठी ...

स्वर्गा परी मिळाली मम , तांबड्या छातीची जननी
आजन्म राहील तुझ्याच चरणी , हि शपथ ओटी
सह्याद्रीच्या कड्या कड्यावर , शिवबाची होती भेटी
मस्तकी भगवा टिळा लाउनी , जन्मलो मी मराठी ...

संत कृष्णा , संत गोदा , संत वाहते यमुना
सळ सळत्या रक्तात , मावळ्यांच्या चालल्या फौजा
महाराष्ट्र धर्म हेच कर्म, माझ्या जीवनी
गर्व मजला या महराष्ट्राचा , जगतोय मी मराठी ...

इतिहास घडवले , साता समुन्द्रपार, फडकवले झेंडे
इतुके खेळ खेळले , मराठांच्या निधड्या छातीच्या जाती
सिंहाच्या गर्जनेत , दिल्लीवर झाली स्वारी
या महाराष्ट्राच्या अभिमानास्पद , लढतोय मी मराठी ...

ह्या इंद्र्नभाच्या छटा तोडूनी , पांघरले या भूमीवरी
संतांच्या अभंगवाणीत , झुळ झुळते नद्यांच्या लहरी
कुबेराचेही धन साचते , भरते अनेक कलेचे घागरी
ह्या काळ्या मातीत रुजलोय , घडतोय मी मराठी ...

मी मराठी , या भुवनी , आव्हाने पेलतो मनगटीवरी
अंगणी उतुंग पर्वताच्या रांगा , पायदळ मैदानी सांगा
पोलादीच्या या शरीरावर घेतल्या हजार घावा
धर्म राखता राखता , स्वराज स्थापितो , हिंदवी राजा
देश रक्षणार्थ , पानिपत लढवले, ऐसा मराठी माझा
मी जन्मलो , पावलो , धन्य धन्य झाहलो , मराठी एकता

- सचिन तळे  

Saturday, 30 July 2011

एक होता कवी ...

एक होता कवी
वाटेवरचे शब्द , शब्द तो वेची
जिथे नव्हता पोहचला रवी
तिथे पोहचला हा गडी ...एक होता कवी...

एके दिवसा , गेला शब्दांच्या गावी
शब्दसागरात नाहून , बसला कवितांच्या घरी
कवितांच्या घरी होती , शब्दांची न्याहरी
न्याहरी करता करता , झाला तो कवी ... एक होता कवी ...

पहाटच्या कीरणातुनी , आली एक परी
परीच्या भोवताली , त्याच्या शब्दांची नगरी
नगरी होती सजली , एक एक शब्दांनी
शब्दांमधी प्रेम ओतून , झाला तो हो कवी ..एक होता कवी ....

मेघांची गर्दी झाली , आली वादळी
वादळी लाटामध्ये , हरवली ती परी
परीच्या विरहाने , शब्द शब्द रडले हर क्षणी
क्षणामध्ये एकांत रुसली , अन जाहला तो कवी... एक होता कवी ....

काय म्हणावे शब्दांना , विचारांच्या नभाना
नभामधुनी शब्द सरी आल्या , आल्या कवितांच्या दारा
दारावरती बसुनी त्याने , संपवले स्व शब्द नभी
तरी भुवनी या शब्दांनी , जिवंत ठेवले त्यास जगी...असा एक होता कवी ...

रचले त्याने आसे काव्य , भिडले सर्वांच्या हृदयी
हृदयीच्या कंपनातुनी , मिळाले काव्यास सुराची भूमी
सुरांच्या भूमी मध्ये , कवीचे नटरंग रूप सजले
सजलेल्या त्या रूपांमध्ये , चमकला असा एक कवी ...असा एक होता कवी

सचिन तळे  29/07/2011